Tiger Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज मिळवतात. पण, काही हिंस्र प्राण्यांचे व्हिडीओ जंगलातील असतात, ज्यात ते इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात चक्क जंगल सफारीसाठी आलेल्या व्यक्तींवर वाघ हल्ला करताना दिसतोय.

माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करत असतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक भागविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करतात; तर अनेकदा ते जंगल सोडून मानवी वस्तीतही शिरकाव करतात. खेड्यात असे प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. दरम्यान, आता एका जंगलातील व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात जंगल सफारीसाठी हत्तीवर बसून गेलेल्या व्यक्तींवर वाघ हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलामध्ये काही लोक हत्तीवर बसून जंगल सफारी करीत आहेत. यावेळी अचानक झुडपांमधून वाघ बाहेर येतो आणि हत्तीवर बसलेल्या व्यक्तीवर हल्ला करतो. या हल्ल्यात त्या व्यक्तीच्या हाताला गंभीर दुखापत होते. सध्या हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: हत्तीला लागली पाणीपुरीची चटक; एका मागे एक खातच राहिला… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jungle.safari.india या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत १३ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहिलेय, “बापरे! किती भयानक दृश्य आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “कॅमेरामॅन अजिबात घाबरला नाही.” तर तिसऱ्या युजरने लिहिलेय, “काळजात धस्स झालं पाहून.” आणखी एका युजर्सने लिहिलेय, “एखादा घाबरूनच मरून जाईल.”

Story img Loader