Viral Video: वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांची दहशत फक्त जंगलातील प्राण्यांमध्येच नाही, तर मनुष्यवस्तीतही पाहायला मिळते. हे हिंस्र प्राणी आपली भूक मिटविण्यासाठी कधी कोणावर हल्ला करतील हे कोणीही सांगू शकत नाही. त्यांच्या हल्ल्याचे अनेक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. त्यात ते खूप क्रूरपणे इतर प्राणी किंवा मनुष्यांवर हल्ला करताना दिसतात.

सोशल मीडियावर प्राण्यांचे असे विविध व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यातील बरेचसे व्हिडीओ थरराक, तर काही व्हिडीओ मजेशीरही असतात. जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ म्हटल्यावर युजर्सही ते आवडीने पाहतात. कारण- त्यातील अनेक गोष्टी आपल्यासाठी कधीही न पाहिलेल्या किंवा अधिक माहिती मिळवून देणाऱ्या असतात. दरम्यान, आता एका वाघाचा थरराक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यात तो एका मनुष्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बाईकवरून प्रवास करीत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या घनदाट झाडीमधून एक वाघ बाहेर येतो आणि बाईकवरून जाणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी त्याचा पाठलाग करतो. यावेळी वाघाच्या चेहऱ्यावरचे खूप क्रूर आणि थरारक हावभाव पाहून, ती व्यक्ती बाईकची स्पीड वाढवते आणि पुढे निघून जाते. त्यानंतर वाघही रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडीत निघून जातो.

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @raajghimire8300 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि २४ हजारांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत.

हेही वाचा: “अरे, काय नाचतेय ही…”, ‘सुसेकी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलेय, “बापरे, मी जर तिथे असतो, तर भीतीनंच गेलो असतो.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बाईक रायडरचं काय झालं असेल.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “वाघ कधीही दया दाखवत नाही.” आणखी एकाने लिहिलेय, “कल्पना करा अशा वेळी तुमच्या गाडीतील पेट्रोल संपले तर…?”