Viral Video: हिंस्त्र प्राणी आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जिवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते, तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक वाघ, बैलावर क्रूर हल्ला करताना दिसतोय.

जंगलातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात, ज्यात काही प्राण्यांचेही व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक वाघ, बैलावर हल्ला करण्यासाठी युक्तीचा वापर करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ जंगलातील असून यावेळी अनेक प्राणी मोकळ्या मैदानावर फिरत असताना अचानक तिथे वाघ येतो आणि झुडपांमध्ये काही वेळ लपून मैदानावर चारा खात असलेल्या बैलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी वाघ आपल्याकडे येत असल्याची चाहूल लागताच बैल सावध होऊन दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी वाघाच्या तावडीत सापडतो. वाघ बैलावर क्रूर हल्ला करून त्याला ठार करतो.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @Wildlife with Irfan या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: ‘भावा, कर्म तुला सोडणार नाही…’ तरुणांनी म्हशींबरोबर घेतला पंगा, पुढे जे घडलं… VIDEO पाहून व्हाल शॉक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘याला म्हणतात निसर्गाचा नियम’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘खूपच थरारक’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘वाघाची शिकार करण्याची पद्धत पाहण्यासारखी आहे’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘बैल सावध होणार इतक्यात हल्ला झाला.’