सध्या एका धोकादायक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. शनिवारी ९ एप्रिलला एक बीएमडब्ल्यू कार डिव्हायडरला धडकली. या घटनेत स्कूटीवरून जाणारा ७ वर्षीय बालक आणि एका महिलेसह अन्य दोन जण जखमी झाले. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने महिला दुसऱ्या कारखाली आली. मिळालेल्या वृत्तानुसार, जखमी महिला आणि कार चालकावर अद्याप उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही भीषण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विरुद्ध दिशेने येणारी बीएमडब्ल्यू कार डिव्हायडर ओलांडून पलीकडे गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यादरम्यान ट्रॅफिकमध्ये उभ्या असलेल्या महिलेचा रस्ता अपघात झाला. त्यांना गंभीर दुखापत झाली असावी, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी डिव्हायडर शेजारी उभ्या असलेल्या आणखी एका महिलेला भरधाव कारने धडक दिल्याने ती थोडक्यात बचावली. ती रस्त्यावरच पडली, पण तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि ती पुन्हा उभी राहिली.

एलियनमुळे महिला गरोदर! अमेरिकच्या संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात धक्कादायक खुलासा

व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सना चांगलाच धक्का बसला. घटनेनंतर आजूबाजूचे लोक महिलेच्या मदतीसाठी धावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळुरू सिटी ट्रॅफिक पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून बीएमडब्ल्यू कारचा ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याचे समजते. @KiranParashar21 ने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून तो आतापर्यंत ७ हजार वेळा पाहिला गेला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video a woman crossing the road was hit by bmw you too will be shocked after seeing what happened next pvp