Viral video : काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. धावत्या लोकलच्या दरवाजात डान्स करतानाचा एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रीलमाफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच; पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक महिला चालत्या ट्रेनच्या दारावर नाचताना दिसत आहे .
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला रेल्वे डब्याच्या दरवाजात उभी असताना ‘होगा तुमसे प्यारा कौन’ या बॉलीवूड गाण्यावर आनंदाने नाचत असल्याचे दिसून येते. इथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती एका वेगवान ट्रेनच्या दरवाजाजवळच नाचत आहे. अशा स्थितीत तिचा थोडासा जरी तोल गेला असता तरी तिला काहीही होऊ शकले असते. मात्र, असे असतानाही तिने न घाबरता, रील बनवणे सुरूच ठेवल्याचे दिसतेय. रील कल्चरचा तरुणाईला एवढा मोह पडलाय की, रील बनविण्याच्या नादात अनेकांना आपल्या जीवाचीही पर्वा राहत नाही. खरे तर क्रिएटिव्हिटीला वाव देणाऱ्या या रील कलेला विकृत रूप येऊ लागलेय का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मुंबई लोकलमध्ये २५ वर्षांपूर्वी किती गर्दी असायची? Video मध्ये दिसणार ‘हे’ स्टेशन ओळखून दाखवाच
हा व्हिडीओ एक्सवर @ChapraZila नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्याला ८५.६ हजार व्ह्युज मिळाले आहेत. त्यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले- मला वाटते की, या मुलीने तिचे मानसिक संतुलन गमावले आहे. तर दुसऱ्याने लिहिलेय की, प्राणापेक्षा जास्त आहेत. एका युजरने लिहिलेय की, अशा लोकांना फक्त पोलिसांचा लाठीमारच सुधारू शकतो.