Viral Video: सोशल मीडियावर सणानिमित्त नेहमीच विविध रील्स बनवल्या जातात. रक्षाबंधन, गणेशोत्सव, कृष्णाष्टमी यांसारख्या विविध सणांनिमित्तच्या गाण्यांवर लाखो लोक रील्स, व्हिडीओ बनवतात. अगदी भारतीयच नव्हे, तर परदेशातील कलाकारही या गाण्यांवर ठेका धरतात. तसेच लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना या ट्रेंडिंग गाण्यांवर व्हिडीओ बनविल्याशिवाय राहवत नाही. नुकताच कृष्णाष्टमीचा सण पार पडला असून यानिमित्त अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका श्वानाला कृष्णासारखे सजवण्यात आले आहे.
श्वान असो किंवा मांजर या दोन्ही प्राण्यांना अनेक लोक जीव लावतात, त्यांना सांभाळतात. घरातील सदस्यांइतकेच त्यांना महत्त्व देतात. त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतात. काही जण या प्राण्यांचे वाढदिवस साजरे करतात. हल्ली अनेक जण आपल्या प्राण्यांसोबत रीलदेखील बनविताना दिसतात. आतादेखील एकाने श्वानाबरोबर कृष्णाष्टमीनिमित्त रील्स बनवल्या आहेत, ज्यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने आपल्या घरातील श्वानाच्या कपाळावर मुकूट, गळ्यात मोत्यांची माळ आणि गुलाबी रंगाचे वस्त्र गुंडाळले असून एका बाजूला मोरपंख लावल्याचे दिसत आहे. तसेच तो यावेळी आपल्या श्वानासह ‘वो है अलबेला’ या गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून युजर्स यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @joythegoldenprince या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा: ‘मैत्री असावी तर अशी..’ तरसाबरोबर व्यक्तीचे खास बाँडिंग; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
यावर एका युजरने लिहिलेय, “असं करून तुम्ही आपल्याच सणांची मस्करी करत आहात“, दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “छान व्हिडीओ.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “प्राण्यांवर प्रेम करणे चांगली गोष्ट आहे, पण त्यांची अशी मस्करी करणे योग्य नाही.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “मला हा व्हिडीओ अजिबात नाही आवडला.”
दरम्यान, यापूर्वीही अनेकांनी आपल्या श्वान आणि मांजरीसह ‘गुलाबी साडी’, ‘आप्पाचा विषय हार्ड’ या गाण्यांवर रील्स बनवल्या होत्या.