Viral Video: समाजमाध्यमांवर अनेक व्हिडीओ सतत चर्चेत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ आश्चर्यकारक असतात. कधी कोणी त्यांच्या आजूबाजूला घडणार्‍या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात, तर काही लोक मनोरंजनासाठी कंटेट तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. हल्ली अनेक जण सार्वजनिक ठिकाणी लोकांबरोबर विविध प्रँक करतात, ज्यामुळे अनेक गमतीशीर घटना कॅमेरात कैद केल्या जातात. पण, कधी कधी प्रँकचा उलट परिणामही पाहायला मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियामुळे प्रँक करणाऱ्यांचा ट्रेंड वाढत चालला आहे. यामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या विविध वयोगटातील लोकांची ते मस्करी करताना दिसतात. अशी मस्करी अनेकांना खळखळून हसवते, तर अनेकांना घाबरवते. तसेच या प्रँकमुळे प्रँक करणाऱ्या व्यक्तीला मारदेखील खावा लागतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण एका रेल्वेस्थानकावर बसलेल्या तीन तृतीयपंथींजवळ जातो आणि तिथे जाऊन त्यांच्या समोर टाळ्या वाजवून त्यांना पैसे मागतो. इतकंच नव्हे तर तो यावेळी त्यांना टाळ्या वाजवून म्हणतो, “ऐ…पैसा दे ना, मे तेरे वासते नाची”, तरुणाचं हे बोलणं आणि मस्करी त्यातील एका तृतीयपंथीला सहन होत नाही. तो उठून त्याला मारायला सुरुवात करतो. अशाप्रकारे हा प्रँक करणं तरुणाला महागात पडतं.

हेही वाचा: ‘जंगलातील महायुद्ध…’ वाइल्डबीस्ट प्राण्याच्या कळपावर सिंहाचा क्रूर हल्ला; घटनेचा थरारक VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि ५० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने या व्हिडीओवर कमेंटमध्ये लिहिलेय, “याला असंच पाहिजे”, दुसऱ्या युजरने लिहिलेय, “परत अशी नाटकं करताना १० वेळा विचार करेल.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “याच्यात एवढी हिंमत कुठून आली”, तर आणखी एकाने लिहिलेय, “अरे देवा, काय मूर्खपणा आहे.”