Viral Video: जीव एकदा गेला की तो परत येत नाही, ही गोष्ट आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, तरीही अनेक जण केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी नको ते जीवघेणे स्टंट करताना दिसतात. यात अनेक जण आपला जीवही गमावतात. मागील काही महिन्यांपूर्वी पावसाळ्यातील धबधब्याजवळील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये अनेक जण पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले होते; तर काही जण थोडक्यात बचावले होते. असे व्हिडीओ समोर आल्यावर नेटकरी तीव्र संताप व्यक्त करतात. आताही असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तितकेच तोटेदेखील आहेत. कारण सोशल मीडियाच्या आकर्षणामुळे लोक अश्लील नृत्य, जीवघेणे स्टंट अशा चुकीच्या गोष्टी करताना दिसतात. असे व्हिडीओ पाहून इतर लोकही अशा गोष्टी करण्यास प्रवृत्त होतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण धबधब्याच्या ठिकाणी पाण्यात भिजत असून यावेळी अचानक पाण्याच्या प्रवाहाने त्याचा पाय सटकतो. पण, त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो जागेवर व्यवस्थित उभा राहतो आणि शूट करणाऱ्या व्यक्तीकडे पाहून हसतो. रील बनवण्यासाठी केलेल्या या प्रकारामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @de_boggio_media या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत १४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर सात लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “अंगात मस्ती दुसरं काही नाही”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “भावा वाचलास तू”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “व्हिडीओ व्हायरल करायच्या नादात जीव गेला असता”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “स्वतःचा जीव सांभाळत जा रे.”