Viral Video: देशभरात अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बऱ्याच शहरांना रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार पाऊस असूनही अनेक जण पावसाच्या दिवसात धबधब्यांवर भिजण्यासाठी जातात, मजामस्ती करताना दिसतात. अनेकदा पाण्याचा प्रवाह इतका असतो की, यामुळे काहींना आपला जीवदेखील गमवावा लागतो. मागील काही दिवसांपासून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
या दरम्यानचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून अनेक जण नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. पण, काही तरुण मंडळी पावसाच्या पाण्यात उतरून रील्स बनवताना दिसत आहेत; तर अनेक जण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीच्या पाण्यात उड्या मारत आहेत तर काही जण धबधब्यांवर जाऊन मजामस्ती करताना दिसत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळतंय, जे पाहून अनेक जण संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण धबधब्याच्या ठिकाणी धावत धावत जातो, तेवढ्यात अचानक त्याचा पाय एका दगडावरून घसरतो आणि तो मोठ्या दगडावर जोरात आपटतो. यावेळी सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत होत नाही. पण, बऱ्याचदा एखादी लहान चूकदेखील अंगलट येऊ शकते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rajvrma_01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत पंचवीस हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “बापरे, खूपच जोरात पडला”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “भावा वाचलास तू”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “व्हिडीओ व्हायरल करायच्या नादात जीव गेला असता”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “स्वतःचा जीव सांभाळत जा रे.”