Viral Video: समाजमाध्यमांवर सातत्याने विविध विषयांवर आधारित व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या गणेशोत्सव सुरू असून, काल गौराईचंदेखील आगमन झालं. सोशल मीडियावरही बाप्पा आणि गौराईचे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत; ज्यावरून बाप्पा आणि गौराईच्या गाण्यांवर लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण रील बनवत असल्याचे लक्षात येतेय. सध्या असाच एका चिमुकलीचा सुंदर व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेशोत्सव म्हटलं की, सगळीकडे उत्साह, आनंद अन् सकारात्मकतेचं वातावरण पाहायला मिळतं. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रत्येक क्षण बाप्पाचे भक्त मनमुरादपणे जगतात. बाप्पाची भक्ती, सेवा करतात. बाप्पाप्रमाणेच गौराईच्या आगमनाचा उत्साहदेखील अनेक महिला आणि मुलींमध्ये पाहायला मिळतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील चिमुकलीदेखील याच आनंदात रील बनविताना दिसतेय. त्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचे कौतुक करताना दिसतायत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका चिमुकलच्या घरी गौराईचं आगमन झालं असून, ती गौराईचं गाणं म्हणताना दिसत आहे. यावेळी त्या चिमुकलीनं नऊवारी साडी नेसून मराठमोळा साजही घातलेला आहे. या चिमुकलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

हेही वाचा: ‘बाप्पा तू जाऊ नको…, बाप्पाच्या विसर्जनादरम्यान श्वान झाला भावूक; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “देवा याला सुखी..”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vedanti_the_dramebaaz या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स त्यावर कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरनं लिहिलंय, “अरे, हिलाच बसवायचं की गौराई म्हणून…” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूप छान… गोड चिमुकली.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “माझी छोटी गवराबाई छान. तोंडाचे हावभाव…” चौथ्या युजरनं लिहिलंय, “बाईSS खूपच गोड.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video aali ga gaurai sonpavali aali a childs stunning dance giving beautiful expressions sap