गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट देशभर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील डायलॉग आणि डान्स स्टेप्सची सगळीकडे चर्चा आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन आले आहे, तेव्हापासून अशा व्हिडीओंची संख्याही वाढली आहे. चित्रपटातील ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ या एका गाण्याच्या डान्स स्टेप्सवर सर्वाधिक व्हिडीओ बनवले जात आहेत.
सध्या या गाण्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही म्हणू शकाल की या गाण्याची क्रेझ आता माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांमध्येही आहे. या गाण्यावर कोंबडीचा डान्स पाहून तुम्ही थक्क व्हाल.
(हे ही वाचा: NASA ने शेअर केले Solar Flares चे अप्रतिम दृश्य; पाहा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ)
व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कोंबडा अंगणात फिरताना दिसत आहे. अचानक तो ‘श्रीवल्ली’ गाण्यावरच्या ‘पुष्पा’ नायक अल्लू अर्जुनने केलेल्या हुक स्टेप्स करायला लागतो. प्रथमदर्शनी त्याची पावले पाहून तुम्हाला समजेल की कोंबडा काय करत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स बघून तो अल्लू अर्जुनचा खूप मोठा फॅन आहे असचं जाणवतं.
(हे ही वाचा: Video: फक्त एका रुमालाने केली स्कूटीची चोरी; चोराची हटके पद्धत पाहून नेटीझन्स चक्रावले)
(हे ही वाचा: Video: फक्त एका रुमालाने केली स्कूटीची चोरी; चोराची हटके पद्धत पाहून नेटीझन्स चक्रावले)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडिया वापरकर्त्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २१ हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट्सही केल्या जात आहेत.