Viral Video: समाजमाध्यमांवर प्राण्यांचे अनेक गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहून आपल्यालाही काही क्षण खूप छान वाटतं. आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे, ज्यामध्ये एका हत्तीचं गोंडस पिल्लू जंगलातील तळ्यात पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे.
हल्ली जंगलातील प्राण्यांचे विविध व्हिडीओ वनाधिकारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका हत्तीच्या पिल्लाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यामध्ये तो त्याच्या आईला शोधताना दिसत होता. हा व्हिडीओदेखील खूप चर्चेत आला होता.
आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ वनाधिकारी @ParveenKaswan यांनी शेअर त्यांच्या X (ट्वीटर) वर केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलातील तळ्यात एक हत्तीचं पिल्लू पोहण्याचा आनंद घेत आहे. यावेळी कधी हत्ती सोंडेने पाणी उडवत आहे तर कधी तो पाण्यात पूर्णपणे डुबकी मारत आहे. वनाधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “फील्डवर असताना एका हत्तीच्या पिल्लाला पाण्यात मज्जा करताना पाहिले.”
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ४० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर यावर अनेक लाइक्सदेखील आल्या आहेत. अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून हत्तीचे कौतुक केले आहे. एका व्यक्तीने लिहिलंय की, “खूप दिव्य,” दुसऱ्या एकाने, “लक्झरी लाईफ” असं लिहिलं आहे.
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, यापूर्वीदेखील हत्तीच्या पिल्लांचे असले मनमोहक व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये हत्तीचे एक गोंडस पिल्लू आईला शोधण्यासाठी धडपड करताना दिसत होते. या व्हिडीओला युजर्सची पसंती मिळाली होती.