घरात एखाद्या कुटुंबातील सदस्याचा बर्थडे असेल तर, त्याचं जंगी सेलिब्रेशन करणं नित्याचीच बाब झाली आहे. गावागावांत तर मोठमोठे कार्यक्रम ठेवले जातात. अलीकडे घरातील पाळीव प्राण्यांचे वाढदिवस साजरे करण्याची पद्धत रूढ होत चालली आहे. पण एखाद्या मांजरीचा वाढदिवस साजरा करताना कधी पाहिलाय का? होय. इटुकला केक कापून मांजरीच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओ पाहून तुम्ही या गोंडस मांजरीच्या प्रेमात पडाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक जणांना पाळीव प्राणी इतके आवडतात की अगदी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसारखेच त्यांना सांभाळतात. अनेक प्राणी प्रेमी मांजरींसाठी अक्षरशः वेडे असतात. त्यांच्यासाठी मांजर पाळणे ही जीवनातील सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक असते. मांजरींची गोंडस मस्ती पाहून पाहणारे प्रत्येक जण त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. एका मांजरप्रेमीनी तर मांजरीचं बर्थ डे सेलिब्रेशन केलंय. मांजरीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : तळपत्या उन्हात राबणाऱ्या आईसाठी लेकीची माया पाहून हृदय पिळवटून जाईल

या व्हिडीओमध्ये पपाया नावाची एक गोंडस मांजर तिचा पहिला वाढदिवस साजरा करताना दिसतेय. मांजरीला तिच्या पहिल्या वाढदिवशी एक स्पेशल ट्रीट दिलीय. फिश फ्रॉस्टिंग आणि १ आकडा दिसणारी एक मेणबत्ती लावून हा अनोखा बर्थ सेलिब्रेट करण्यात आलाय. तिच्या वाढदिवसासाठी खास केक तयार करण्यात आलाय. या बर्थ डे कॅटला छान गुलाबी आणि निळ्या रंगाचा खास पोशाख देऊन तिला सजवण्यात आलं होतं. या लूकमध्ये ही मांजर खूपच गोंडस दिसत आहे.

आणखी वाचा : विमानाने उड्डाण केलं, वेग पकडला आणि अचानक एसी बंद पडला, पुढे काय झालं ते VIRAL VIDEO मध्येच पाहा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL : ट्विटरवर ट्रेंड करतंय ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओके..!’; Memes चा पाऊस!

या अनोख्या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे. papaya.cat नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत मांजरीवर आपलं प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहेत.

Story img Loader