Viral Video: शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करुन राहतात. या जगात असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्या शाळेशी जोडलेल्या काही आठवणी नसतील. शाळेतल्या गोड गमती जमती आणि मित्र मैत्रीणी नेहमीच आपल्या स्मरणात असतात. मात्र, शाळेनंतरच्या आयुष्यात हे मित्र मैत्रीणी दूरावतात. अनेकदा त्यांची कधी भेटही होत नाही. हल्ली सोशल मीडियाच्या वापरामुळे आता हेच जुने मित्र मैत्रीणी पुन्हा संपर्कात येऊ लागले आहेत आणि पुन्हा एकदा नियोजन करुन आपल्या शाळेत जाऊन एकत्र भेटू लागले आहेत. आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील तुमच्या शाळेची आणि मित्र मैत्रीणींची नक्कीच आठवण येईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तब्बल २४ वर्षांपूर्वीचे दहावीतले मित्र मैत्रीणी एकत्र आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
mp theft viral video
VIDEO : दुकानात चोरी करण्याआधी चोराने घेतले देवाचे आशीर्वाद, नंतर लॉकरमधील पैसे चोरून झाले पसार; घटना CCTV मध्ये कैद
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे सर्व मित्र मैत्रीणी शाळेतील एका वर्गात बसले असून एका बाजूला मित्र मंडळी बसलेली दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला मैत्रीणी बसलेल्या दिसत आहेत. ही दहावीची बॅच १९९९-२००० सालची असून हे तब्बल २४ वर्षांनी पुन्हा एकत्र आले आहेत. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये,”तब्बल २४ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दहावी बॅच १९९९-२००० चे मित्र मैत्रीणी पुन्हा एकत्र आले.” या व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून या इन्स्टाग्रामवरील @santosh_katwate____karadkr या अकाउन्टवर शेअर करण्यात आला आहे. शिवाय या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल आठ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर तीन लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे.

हेही वाचा: पोरा तुझा नाद खुळा! ‘गुलाबी साडी’ अन् ‘पिरतीच्या झुल्यात…’ गाण्यावर चिमुकल्याचे जबरदस्त ठुमके VIDEO पाहून म्हणाल, ‘काय नाचतोय…’

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स देखील करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “या सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचे खूप खूप आभार”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “लाखो करोड रुपये दिले तरी ते दिवस परत येणार नाही”, तर तिसऱ्या युजरने गमतीमध्ये लिहिलंय की, “सगळे सुधारलेली दिसत आहेत पण, मागचा आहे तसाच दिसतोय, तर आणखी एकाने लिहिलंय की, “असं खूप कमी पाहायला मिळतं अलीकडच्या काळात खरंच खूप नशीबवान आहात सगळे मित्र.” दरम्यान, यापूर्वी देखील अशाच आणखी एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता ज्यामधील मित्र मैत्रीणी १४ वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते.

Story img Loader