लहानपणी तुम्ही ‘अक्कल मोठी की म्हैस?’ अशी म्हण आपण ऐकली असेलच. याचं उत्तर देण्यापूर्वी लोक अनेकदा तुमच्या मनात विचार आला असेल की याचं योग्य उत्तर नेमकं काय असू शकतं? मात्र, आजच्या युगात अशा काही घटना पाहायला मिळतात की, त्याचं उत्तर शोधणं आता सोपं झालं आहे. अनेकदा तुम्ही म्हशींना शेतात चरताना किंवा रस्त्यावर काहीतरी खाताना पाहिलं असेल. पण तुम्ही कधी म्हशीला स्वतः हातपंप चालवून पाणी पिताना पाहिलं आहे का? नसेल तर हा व्हिडीओ जरूर पाहा.
म्हशीने अशा अंदाजात हॅण्डपंपने काढलं पाणी
होय, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. एका म्हशीने आपली बुद्धीचा वापर करत पाणी पिण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. म्हशीने आपली तहान शमवण्यासाठी आपल्या शिंगांचा वापर केलाय. या तहानलेल्या म्हशीने पाणी पिण्यासाठी केलेला हा जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है! या म्हशीने आपल्या शिंगांच्या मदतीनं हॅण्डपंप वर-खाली करण्याच्या प्रयत्न करत होती. अखेर त्यातून पाणी आलं आणि पाणी बाहेर येताच तिने पाणी पिण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
आयपीएस अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केला आहे
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आता सांगा- अक्कल मोठी की म्हैस?’ हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आपापल्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले की, ‘म्हशीचं शहाणपण’. माणसाची अक्कल तर हा व्हिडीओ तयार करण्यापर्यंतच आहे, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. तर आणखी दुसरा युझर म्हणतो माणसाची अक्कल जेव्हा चरायला जाते तेव्हा म्हैस मोठी असते. अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.
आणखी वाचा : रस्त्याच्या कडेला उभी होती मुलगी, अन् तरूणाने तिच्या हातात जे दिलं ते पाहून हैराण व्हाल! VIRAL VIDEO पाहाच
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :
काही युजरने केलं असं वर्णन
तर एका युजरने ‘अक्कल मोठी की म्हैस’ ही म्हण तपशीलवारपणे सांगितली आहे. यात त्यांनी लिहिले, ‘ही म्हण चुकीची आहे. खरं तर ‘अक्कल मोठी की म्हैस’ या म्हणीमध्ये ‘म्हैस’ हा शब्द चुकीचा उच्चारला गेला आहे, हा अपभ्रंश आहे. योग्य म्हणीमध्ये ‘म्हैस’ हा शब्द ‘म्हैस’ नाही तर ‘बयस’ होय म्हणजे ‘वय’. ‘अक्कल मोठी की बायस’ ही योग्य म्हण आहे. ज्याचा अर्थ सामान्यतः ‘शहाणपण मोठं की वय’ असा होतो.
हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाख १३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलंय. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ‘आत्मनिर्भर म्हैस’ म्हणून हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.