सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ शेअर होत असतात. काही व्हिडीओ हे हसवणारे असतात तर काही व्हिडीओ हे डोळ्यात पाणी आणणारे असतात. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अगदी तसाच आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी नक्की येईल. माणूसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडीओ असून जर तुमच्यामध्ये एखादी गोष्ट शिकवण्याची इच्छा असेल तर कोणत्याच अडचणी तुमचं काही वाकडं करू शकत नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कन्स्ट्रक्शनच्या साईटवर लहान मुलगा फिरताना दिसून येत आहे. तिथे काम करत असलेल्या एका इंजिनीअरची नजर त्या मुलावर जाते. हा मुलगा इथल्या कन्स्ट्रक्शनच्या साईट नक्की काय करायला आलाय या विचाराने तो इंजिनिअर मुलाच्या मागे मागे जातो. तो मुलगा कन्स्ट्रक्शन साईटवरील पुठ्ठे जमा करताना दिसून आला. कन्स्ट्रक्शन साईटवरील पुठ्ठे जमा करून हा मुलगा काय करतोय याची उत्कुकता व्हिडीओमधल्या इंजिनीअरला असते. हा मुलगा जस जसा पुढे जातो तस तसं हा इंजिनीअर सुद्धा त्या मुलाचा पाठलाग करतो. त्यानंतर जे चित्र दिसून आलं ते पाहून फक्त व्हिडीओमधला इंजिनीअरच नव्हे तर सोशल मीडियावरील युजर्स सुद्धा भारावून जात आहे.
आणखी वाचा : डोक्यावरच्या पदरात चेहरा लपलेला, पण तरीही या लेकाने त्याच्या आईला ओळखलंच… पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : ट्रेनमध्ये जुगाड करत बनवली ‘स्पेशल सीट’, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही
या मुलाने कन्स्ट्रक्शन साईटवरील कच्चं आणि टाकाऊ सामान एकत्र करत छोटंस घर उभा केलेलं असतं. हे पाहून इंजिनीअर सुद्धा भावूक होतो. या मुलाने इतकं पक्क घर उभा केलेलं असतं की कोसळणाऱ्या पावसात हे घर उभा होतं. हे पाहून इंजिनिअर या मुलासाठी घर बांधण्याचा निर्णय घेतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून लोकांना खूपच आवडू लागलाय.
हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केलाय. बघता बघता या व्हिडीओला आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत.