इंग्लिश गाण्यांची फारशी आवड नसलेल्यांनाही ब्रिटनी स्पीअर् हे नाव माहीत आहे. १९९०च्या दशकाच्या शेवटी आणि २००० च्या दशकाच्या सुरूवातीला ब्रिटनी स्पीअर्स हे नाव पाॅप जगतात जबरदस्त प्रसिध्द होतं. तिच्या प्रत्येक गाण्याला जगभर तुफान प्रसिध्दी मिळायची. ‘हिट मी बेबी वन मोर टाईम’, ‘लकी’, ‘टाॅक्झिक’ अशी तिची अनेक गाणी जगभर तुफान चार्टबस्टर्स ठरली.
आताही ब्रिटनी मोठी स्टार असली तरी १०-१५ वर्षांपूर्वी तिचा जो दबदबा होता तो आता निश्चितच नाही. २००३ साली रिलीज झालेलं तिचं ‘टाॅक्झिक’ हे गाणं जाम फेमस झालं होतं. आता चौदा वर्षांनी तिचं हे गाणं पुन्हा चर्चेत आलंय.
पण यावेळी हे गाणं चर्चेत येण्याचं कारण आहे एक फ्लाईट अटेंडंटमुळे. या फ्लाईट अटेंडंटने ब्रिटनी स्पीअर्सच्या या गाण्यावर त्याच्या विमानातच जो डान्स केला आहे. त्याचा व्हिडिओ जाम व्हायरल झालाय. हा फ्लाईट अटेंडंट ‘एअर एशिया’ या एअरलाईन्सचा हा फ्लाईट अटेंडंट आहे आणि तो त्याच्या विमानातल्या कॅबिनमध्ये जो थिरकलाय त्याला तोड नाही. पाहा हा व्हिडिओ
A Toxic performance on A330 by @AssrafNasir. Cc @britneyspears pic.twitter.com/xoRksL1DZw
— huski (@FarhanRzman) March 16, 2017
अश्रफ नासिर असं या फ्लाईट अटेंडंटचं नाव आहे. ब्रिटनी स्पीअर्सच्या या गाण्यावर तो नाचत असताना त्याच्या सहकाऱ्याने हा व्हिडिओ शूट केलाय. या व्हिडिओ नेटवर तुफान हिट्स मिळाले आहेत. एवढंच काय ‘एअर एशिया’च्या सीईओलाही या व्हिडिओची गंमत वाटून त्याने हा व्हि़डिओ आपल्या इन्स्टाग्रॅम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये असणारं टॅलेंट पाहून मला आनंदच झाला. तसंच आमचे कर्मचारी त्यांचं काम करत असतानाही जर एवढे आनंदी असतील तर त्याचाही मला अभिमान वाटतो. एअर एशियाचे सीईओ टोनी फर्नांडिस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.
पण या अटेंडटच्या या डान्समुळे ब्रिटनी स्पीअर्सच्या या जुन्या गाण्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे हे नक्की