गेल्या वर्षी इंडिगो कंपनीच्या एका एअर होस्टेसने श्रीलंकन ​​गाणं ‘मनिके मागे हिते’वर डान्स व्हिडीओ शेअर केल्यानंतर ती झपाट्याने व्हायरल झाली होती. तेव्हापासून केबिन क्रूमध्ये डान्स करण्याचा हा ट्रेंड बनला आहे. इंटरनेटवर या ट्रेंडमधले अनेक व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात एअर होस्टेस लोकप्रिय गाण्यांवर डान्स करत आहे. हा ट्रेंड फॉलो करत, स्पाईसजेटची सुंदर एअर होस्टेस रिकाम्या विमानात दीपिका पदुकोणच्या ‘बलम पिचकारी’ या गाण्यावर डान्स करताना दिसली. या व्हिडीओमध्ये एक सीनियर फ्लाइट अटेंडेंट उमा मीनाक्षी तिच्या फ्लाइट अटेंडंटच्या युनिफॉर्ममध्ये डान्स करताना दिसून आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पाइस जेट एअरलाइन्सची सुप्रसिद्ध एअर होस्टेस उमा मीनाक्षी ही नेहमीच तिच्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आणकी एक नवा व्हिडीओ शेअर केला, जो झटपट व्हायरल देखील झाला आहे. यामध्ये उमा मिनाक्षी विमानाच्या आत ‘बलम पिचकरी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती नेहमीप्रमाणे प्लाईट अटेंडेंटच्या युनिफॉर्ममध्ये दिसून येतेय. परंतू व्हिडीओ शेवटी ती युनिफॉर्मच्या ऐवजी एका पांढऱ्या रंगाच्या पंजाबी सूटवर दिसून आली. या व्हि़डीओमध्ये होळीच्या गाण्यावर डान्स करताना तिच्या चेहऱ्यावरील जबरदस्त एक्सप्रेशन पाहून सारेच जण तिच्या प्रेमात पडू लागले आहेत. डान्स करताना ती अगदी दिलखुलासपणे डान्स स्टेप्स करताना दिसून येतेय.

आणखी वाचा : Viral Video : छा गए पाजी! मियामीच्या रस्त्यावर अचानक हिप-हॉप डान्स करू लागला हा शीख तरूण

हा व्हिडीओ शेअर करत एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘होळी स्पेशल, सर्वांना होळीच्या शुभेच्छा’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. यासोबत तिने एक टीप देखील लिहिलीय. “प्रवाशांशिवाय विमान ग्राऊंडवर असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. यासाठी पूर्वपरवानगी देखील घेतली आहे. सुरक्षेचा कोणताही अडथळा नाही. ट्रेंडसह उड्डाण करा” असं या टीपमध्ये तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘शांतपणे उभा होता ना कुत्रा, उगाच लाथ मारायला निघाला, अन् स्वतःच धापकन पडला’

इथे पाहा हा व्हायरल व्हि़डीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कासवाला कधी डान्स करताना पाहिलंय का? हा दुर्मिळ क्षण एकदा बघाच

चार दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून केबिन क्रूच्या ट्रेंडिंग गाण्यांवर डान्स करण्याचा हा ट्रेंड यूजर्सना खूपच आवडला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २० हजाराहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांना या व्हिडीओमधल्या एअर होस्टेसचा डान्स आवडला असून हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.