एअर इंडियाचे विमान दिल्लीतील एका फूट ओव्हरब्रिजखाली अडकलेले दाखवणारे एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ही घटना राष्ट्रीय राजधानीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ, दिल्ली-गुडगाव महामार्गावर ही घडली आहे. सुमारे ४० सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एअर इंडियाचे विमान रस्त्याच्या एका बाजूने अडकलेले असताना दुसरी बाजूने विमानाने रस्ता अडवलेला दिसतो आहे.
पुलाच्या खाली अडकलेल्या विमानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच एअरलाईनने पुष्टी केली की कोणताही अपघात झाला नाही. एअरलाइन्सने सांगितले की, विमानाची वाहतूक त्याच्या नवीन मालकाने केली होती, ज्याने ते एअर इंडियाकडून विकत घेतले होते.“हे एक जुने, स्क्रॅप केलेले विमान आहे जे आम्ही आधीच विकले आहे. कोणतीही अतिरिक्त माहिती नाही कारण ती ज्या व्यक्तीला विकली गेली आहे त्याचं याबद्दल माहिती असेल.” एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
“विमान नक्कीच दिल्ली विमानतळाच्या ताफ्यातील नाही ते कोणत्याही पंखांशिवाय वाहतूक केले जात आहे. हे एक स्क्रॅप केलेले विमान आहे असे दिसते आणि चालकाने वाहतूक करताना चुकीचा निर्णय घेतला असावा, ”अधिकारी म्हणाले.