ब्रिटन सध्या गेल्या तीस वर्षांतील सर्वात मजबूत वादळाचा सामना करत आहे. युनिस वादळ (Storm Eunice ) ब्रिटनमध्ये आल्यापासून सर्वत्र परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. अशावेळी लंडनमधील हिथ्रो विमानतळावर विमानांचे लँडिंग करणेही कठीण झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे विमानेही डळमळीत होत आहेत. पण या चॅलेंज दरम्यान एका भारतीय पायलटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या धोकादायक युनिस वादळात एअर इंडियाच्या विमानाने एवढं नेत्रदीपक लँडिंग केलं आहे की, प्रत्येकजण त्या विमानाच्या पायलटचं कौतुक करताना थकत नाहीयेत. व्हायरल व्हिडीओमध्येही बिग जेट टीव्हीचे संस्थापक जेरी डायर्स हे ‘विमान नीट उतरू शकेल की नाही हे मला पाहायचे आहे,’ असे म्हणताना ऐकू येत आहे. व्हिडीओमध्ये पायलटला यश आलेले दिसते. हे अत्यंत कुशल भारतीय पायलट आहेत.

Immigration policy of Donald Trump
अन्यथा : प्रगतीच्या प्रारूपाचा प्रश्न!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर

(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)

आता, एअर इंडियाच्या या विमानाने जोरदार वाऱ्याशी झुंज देत यशस्वी लँडिंग केल्याने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सतत शेअर केला जात असून, त्या पायलटचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. व्हिडीओ शेअर करताना एका यूजरने लिहिले आहे की, तो खूप कुशल पायलट आहे. एअर इंडियाच्या पायलटने B787 ड्रीमलायनर विमान हिथ्रो विमानतळावर यशस्वीरित्या उतरवले आहे. जेव्हा इतर अनेक विमाने उतरू शकली नाहीत, जेव्हा अनेक उड्डाणे रद्द करावी लागली तेव्हा भारतीय पायलटला हे यश मिळाले.

(हे ही वाचा: “जगातील सर्वात मोठा नशा कोणता आहे?” लग्नात पंडितजींनी नवरदेवाला विचारला प्रश्न; Viral Video)

या वादळाच्या काळात भारताने एक नव्हे तर दोन विमानांनी हिथ्रो विमानतळावर यशस्वी लँडिंग केले. एक AI147 हे हैदराबादहून आले होते, तर दुसरे AI145 गोव्याहून आले होते. दोन्ही विमानांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग केले. माहितीनुसार AI147 विमानाचे कमांडर कॅप्टन अंचित भारद्वाज (Captain Anchit Bhardwaj ) होते, तर AI145 विमानाचे कमांडर कॅप्टन आदित्य राव (Captain Aditya Rao )होते.

(हे ही वाचा: रोहितला राग अनावर! भुवीने कॅच सोडताच चेंडूला मारली लाथ; Video Viral)

दोन्ही पायलटच्या या यशस्वी लँडिंगमुळे एअर इंडियाही खूप उत्साहित आहे. आज तकशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रिटिश एअरवेज आणि कतार एअरवेजच्या विमानांना लँडिंग करताना खूप अडचणी येत होत्या, पण आमच्या पायलटनी अतिशय अचूक आणि उत्कृष्ट लँडिंग स्कील दाखवले. ते सर्व उच्च प्रशिक्षित आहेत.