आतापर्यंत आपण जंगली जनावरांच्या संबंधित अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहिले असतील आणि ते शेअरही केले असतील. त्यातच या जनावरांचे शिकार करतानाचे व्हिडीओ अतिशय भयानक असतात. असाच एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडीओ शिकार करतानाचा नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचे मन नक्कीच विचलित होईल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका अजगराने संपूर्ण मगर गिळली.
rosiekmoore या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एका १८ फुटाच्या अजगराने संपूर्ण मगर गिळल्याचे दिसते. यानंतर त्याचे पोट खूपच फुगले होते. यामुळे तपासणीच्या वेळी कर्मचाऱ्यांना या अजगराचे पोट फाडावे लागले. व्हायरल होणारा हा व्हिडीओ अमेरिकेतील फ्लोरिडा येथील असल्याचा सांगण्यात येतंय.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या अजगराने ५ फुटाची संपूर्ण मगर गिळली होती. मात्र यानंतर त्याला हलताही येत नव्हते. त्याला अशा अवस्थेत पाहून उद्यानातील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि त्याच्या या स्थितीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले. अजगराच्या या स्थितीचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्याचे पोट फाडणे अतिशय आवश्यक होते. मात्र यानंतरचे दृष्य अतिशय भयानक होते.
“…हाच आहे का तुझा संघर्ष?”; ‘स्ट्रगल इज रिअल’ म्हणणाऱ्या सई ताम्हणकरवर नेटकरी भडकले
अजगराचे पोट फाडल्यानंतर त्याच्या पोटातील मगर पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. दरम्यान रोजी मूर यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत साडे तीन लाखांहूनही अधिक लोकांनी लाइक केला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर धक्का बसला असून ते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.