कोणासोबत कधी काय होईल, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, जे पाहून धक्का बसतो. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हालाही असेच काहीतरी सांगायला आवडेल. सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका कुटुंबावर कसा मृत्यू ओढावतोय हे आपण पाहू शकतो, पण सुदैवाने घटनेनंतर त्यांना ओरखडाही येत नाही. ही घटना आपल्या सर्वांशी संबंधित आहे, कारण प्रत्येक घरात पंखे असतात आणि लोकं पंखाखाली बसून हवा घेत असतात.

अचानक छतापासून वेगळा होऊन पंखा पडला जमिनीवर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक कुटुंब एका छोट्याशा दुकानात बसलेले दिसत आहे. लहान मुलगी, तिची आई आणि कुटुंबातील काही सदस्य जवळच आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या स्क्रीनमध्ये दिसत आहे की, महिला आणि तिची मुलगी पंख्याखाली बसले आहेत आणि काही सेकंदात पंखा हळूहळू कमकुवत होऊन खाली पडू लागला. या दरम्यान कोणाचेही लक्ष त्या पंख्याकडे जात नाही. शेवटच्या क्षणी मुलीची नजर पंख्याकडे जाते आणि मग काहीतरी बोलते. तेव्हा जवळून चालणाऱ्या महिलेची नजर पंख्यावर पडते.

सीसीटीव्ही फुटेज पाहून तुम्ही थक्क व्हाल

पंखा पडणार असल्याचे समजतात महिलेला बाजूला होतेच आणि काही सेंकदातच पंखा छतापासून वेगळा होऊन जमिनीवर पडतो. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ @only..sarcasm या नावाने अपलोड करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ अपलोड करताना यात ‘मेरा एग्जाइटी लेवल’ यमराज रजेवर होते भाऊ आज. असे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. तसेच इतर अनेक युजर्सनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader