Viral Video: व्यक्ती वयाने लहान असो किंवा वृद्ध, लहान लहान गोष्टींमध्ये प्रत्येकाचा आनंद दडलेला असतो. आयुष्यातील दुःखाला बाजूला सारून चेहऱ्यावर हास्य ठेवणे आताच्या पिढीसाठी खूप कठीण आहे. पण, अगोदरच्या पिढीतील लोकांसाठी या गोष्टी सहज शक्य आहेत. सोशल मीडियावर विविध वयोगटांतील लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे; ज्यात एक वयोवृद्ध महिला जबरदस्त डान्स करताना दिसतेय जे पाहून अनेक जण तिचे कौतुक करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवरील व्हिडीओ चर्चेत असतात. त्यातील काही व्हिडीओ मनोरंजन करणारे, तर काही व्हिडीओ काळजाचा थरकाप उडवणारे असतात. काही मोजके व्हिडीओ क्षणार्धात प्रचंड व्हायरल होऊन लाखो व्ह्युज मिळवतात. अशा अनेक व्हिडीओंमध्ये लहान मुलं, तरुण-तरुणी, वयोवृद्ध व्यक्ती आपली कला सादर करताना दिसतात. आतादेखील एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यात एक वयोवृद्ध महिला डान्स करताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वयोवृद्ध महिला मॉडर्न लूकमध्ये बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसतेय. एखाद्या पंचविशीतल्या तरुणीलाही लाजवेल अशा उत्साहात ती नाचत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि डान्स स्टेप्सही कमाल आहेत.
हा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @neerusaini1970 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत चार दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलेय, “जे मनाला आवडतं तेच करायचं.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर.” तिसऱ्याने लिहिलेय, “ह्या आताच्या पिढीत जन्मायला हव्या होत्या.” चौथ्या युजरने लिहिलेय, “मन कधीही म्हातारं होत नाही.”