महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव म्हटलं की तरुणाईमध्ये वेगळाच उत्साह संचारतो. ‘गोविंदा आला रे आला’, ‘मच गया शोर सारी नगरी रे’, यांसारख्या गाण्यांची जादू या दिवशी प्रकर्षाने जाणवते. गल्लोगल्ली दहीहंडी बांधली जाते आणि थरावर थर चढवून तरुण ही हंडी जोशात फोडतात. पाण्याचे फवारे अंगावर घेऊन बेधुंद होऊन नाचण्यासाठी गोपाळभक्तांसह गोविंदांनी शहराच्या मध्यवर्ती भागात दहीहंडी मंडळांपुढे मोठी गर्दी करतात.
हंडी फोडण्यात आता मुलीही मागे नाहीत. मुलींची गोविंदा पथकेही आता मोठ्या प्रमाणावर तयार झाली आहेत. महिनाभर आधीपासूनच दहीहंडीची तयारी आणि सराव सुरु होतो. याच उत्साहात भर पाडणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील सर्वांत खास गोष्ट म्हणजे नऊवारी नेसलेल्या एका आजीबाईंनी थरावर चढून ही दहीहंडी फोडली आहे.
ही दहीहंडी फोडण्यासाठी सर्व महिला जमल्या होत्या. यावेळी त्यांनी २ थर लावले होते. या आजीबाई दुसऱ्या थरावर चढल्या. व्हिडीओ पाहताना सुरुवातीला या आजी पडत आहेत की काय अशी भीती वाटते. मात्र दुसऱ्याच क्षणाला त्या आपल्या डोक्याने ही हंडी फोडतात. हे दृश्य पाहून भल्याभल्यांना धक्का बसला आहे. दहीहंडी फोडल्यावर मात्र तिथे असलेल्या महिलांचा आनंद बघण्यासारखा आहे.
बुरखा घालून प्रेयसीला भेटायला घेला अन्…; उत्तरप्रदेशातील ‘अजब प्रेम की गजब कहानी’
फेसबुकवर स्टार मराठी या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत २.८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर दोन लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे. साडेतीन हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या असून त्यांनी या आजीचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘आजच्या दिवसातील सर्वांत सुंदर हंडी.’