आपल्याकडे किती सुविधा आहेत, आपण किती नशीबवान आहोत याची अनेकांना जाणीव नसते. सगळ्या गोष्टीबाबत सतत तक्रार करतानाच आपण सर्वांना पाहतो, ऐकतो. कधीकधी आपणही त्यांपैकी एक होऊन जातो, ते आपल्यालाही कळत नाही. आपणही प्रत्येक गोष्टीबाबत सतत तक्रार करत राहतो, ज्यामुळे आपल्याला बळ देणाऱ्या, आपले संरक्षण करणाऱ्या शक्तीचा आपल्याला विसर पडतो. याचीच आठवण करून देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये काय घडले जाणून घ्या.
आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाण्यात पोहणाऱ्या माणसाकडे आकाशात उडणारे गरुड वेगाने जवळ जात, त्याच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसते. व्हिडीओ पाहताना आता या माणसाला जीव गमवावा लागणार असे वाटते, पण त्या माणसाच्या जवळ जाताच ते गरुड दिशा बदलते आणि शिकार न करताच निघून जाते. हा थक्क करणारा प्रसंग पाहा
व्हायरल व्हिडीओ:
आणखी वाचा: बॅगेत असलेल्या गोष्टीने वेधलं साऱ्याचं लक्ष; प्रवासादरम्यानचा हा व्हिडीओ Viral का होतोय एकदा पाहाच
आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर करत मोलाचा संदेश दिला आहे. त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शममध्ये लिहले आहे, ‘काहीवेळा आपण किती भाग्यवान आहोत याची आपल्याला कल्पना नसते. आपल्या नकळत आपले संरक्षण केले जाते, आपली काळजी घेतली जाते. अगदी सामान्य वाटणाऱ्या प्रत्येक दिवसासाठीही आपण कृतज्ञ असायला हवे’. या कॅप्शनमधून त्यांनी मोलाचा संदेश दिला आहे.