monkey video: महिंद्रा आणि महिंद्रा या लोकप्रिय वाहन निर्मात्या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ते सतत या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर काही ना काही तरी शेअर करत असतात. महिंद्रा यांनी ट्विटरवर काहीही शेअर केलं की ते ट्विट लगेच व्हायरल होतं.सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडिओ भावनिक असतात तर काही मजेशीर असतात. नुकताच आनंद महिंद्रांनी एका माकडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
माकडालाही लागले मोबाईलचे व्यसन
आजकाल तरुणांपासून सगळ्यांनाच मोबाईलवर रिल बघण्याचं वेड लागलं आहे. आपण आता सतत मोबाईल स्क्रोल करत रील पाहत असतो. आता हेच वेड प्राण्यांनाही लागलं आहे. माणसांप्रमाणे माकडांची बुद्धीही दिवसेंदिवस तल्लख होत असल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहे. एकीकडे देशात इंटरनेटचा वापर घरोघरी होत असतानाच आता मोबाईलवर रिल बघणाऱ्या माकडांनं वेध लागले आहेत. मोबाईल हातात घेतल्याशिवाय माणसांची सकाळ होत नाही असं म्हणतात. ते सत्यच आहे. तर दुसरीकडे आता जंगलातील माकडंही मोबाईलमध्ये क्विल करत असल्याचं एका व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका महिलेच्या बाजूला बसून हे माकड मोबाईल हातात घेऊन रिल पाहत आहे आणि एक एक रिल स्क्रोल करत आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Transgenders Wedding: एकाच वेळी पाच ट्रान्सजेंडर्सचं आपल्या गुरूशी लग्न; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांपर्यंत पोहचला असून नेटकरी गमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.