Viral Video Today: ‘No Mans Land’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंटार्क्टिका खंडाबद्दल अनेकांना कुतुहूल असते. पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवाचे टोक असणाऱ्या अंटार्क्टिकामध्ये निसर्गाची किमया प्रत्यक्ष दिसून येते. अंटार्क्टिका हे पृथ्वीचा अक्ष आणि पृष्ठभाग ज्या ठिकाणी जुळतात त्याचे अचूक स्थान आहे त्यामुळे या भागात सहा महिन्याच्या कालावधीसाठी अंधार व सहा महिने प्रकाश असा नैसर्गिक चमत्कार पाहायला मिळतो. अलीकडेच अंटार्क्टिकामध्ये सहा महिन्यांच्या सलग रात्रीनंतर पहिल्यांदाच सूर्योदय झाला आहे. सहा महिन्यांच्या अंधारानंतर दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा सूर्यकिरण पडल्यावरचे एक अत्यंत सुंदर दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Reddit वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर आतापर्यंत ४१, ००० व लाईक्स व हजारो कमेंट्स आहेत. एका गॅलरीमधून शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ असावा असा अंदाज आहे. सहा महिन्यांनंतर अखेरीस रात्र संपून सूर्योदय होत आहे असे या व्हिडिओत लिहिलेले दिसत आहे. हा व्हिडीओ शूट करतेवेळी अंटार्क्टिकाचे तापमान हे -७२ डिग्री सेल्सियस असल्याचेही लिहिण्यात आले आहे.
अंटार्क्टिकाचा उन्हाळा ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत असतो आणि यावेळी सूर्य जवळजवळ नेहमीच आकाशात असतो. उन्हाळ्यात, सूर्य अजिबात मावळत नाही तर त्यापुढील सहा महिने अंटार्क्टिकामध्ये अंधार असतो.
सहा महिन्याच्या अंधारानंतर जेव्हा अंटार्क्टिकात पहिलं सूर्यकिरण पडतं..
मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!
दरम्यान हा व्हिडीओ पाहून अनेकांना अंटार्क्टिकाला जाण्याची इच्छा होत असल्याचे कमेंट बॉक्समध्ये दिसून येत आहे. यातीलच काही युजर्सनी अंटार्क्टिकामध्ये जिवंत राहणे हे किती कठीण असू शकते यावरही भाष्य केले आहे. हे तापमान आपल्या फुफ्फुसातील पेशी गोठवु शकतात, याला डिफ्यूज अल्व्होलर रक्तस्त्राव म्हणतात असे या युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे. हा मूळ व्हिडीओ हा टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता याचे नेमके ठिकाण नमूद करण्यात आलेले नाही.