जगात एकापेक्षा एक उमदे कलाकार आहेत. आपली उत्कृष्ट कलाकृती दाखवत अशाच एका कलाकाराने बर्फाच्या शिल्पावरच एक महाकाय साप कोरला आहे. या सापाची कलाकृती लोकांना पहिल्या नजरेतच घाबरवणारी ठरतेय. अगदी खराखुरा महाकाय साप आपल्यासमोर असल्याच भास होऊ लागतो. या सापाला पाहताना पहिल्या नजरेतच लोकांच्या अंगावर काटा येतो. या कलाकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने बर्फावर चक्क आपल्या हातांनी हा महाकाय साप कोरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, कलाकार केवळ काही मूलभूत साधनांच्या मदतीने स्वतःच्या हाताने ही कलाकृती बनवत आहेत. माणसाच्या हाताने काढलेली बर्फातली विशालकाय सापाची आकृती इतकी खरी दिसते की पहिल्यांदा पाहिल्यानंतर लोक घाबरून जातात. आईस आर्टिस्टच्या या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे. त्याने बनवलेल्या सापाचा आकार हा Coiled Reptile असा आहे. सापाच्या डोक्याची रचनाही अधिक चांगल्या पद्धतीने केली आहे. महाकाय सापाच्या काळ्या शरीरावर पांढरे पट्टे असतात, ज्यामुळे ते अगदी खऱ्याखुऱ्या सापासारखं दिसून येतं.

आणखी वाचा : छतावरून खाली उतरताना शिडीच्या पायऱ्यांवरून घसरला चिमुरडा, हा VIRAL VIDEO पाहून सारेच झाले सुन्न

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : माशाच्या तोंडात सिरिंज टोचल्यानंतर शेकडो पिल्ले बाहेर पडली! असं दृश्य तुम्ही कधीच पाहिलं नसेल!

बर्फापासून बनवलेल्या सापाचा हा आकार अतुल्य कलाकृतीचं उदाहरण आहे. केवळ मूलभूत साधनांचा वापर करून बर्फावर महाकाय साप कोरणे ही एक उत्तम कला दर्शवते. लोकांना ही कला खूपच आवडली आहे. सोशल मीडियावर असणारे हजारो लोक या निर्मितीचं कौतुक करत आहेत. अशा कलाकृती कला प्रदर्शनात असाव्यात, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.