वयोवृद्ध उगाच बोलत नाहीत की काही दुर्घटनेपेक्षा उशीर झालेला बरा. पण अनेकदा हे वाक्य अनेकांच्या लक्षात राहत नाही. देशात अनेक ठिकाणी रोज रेल्वे रूळ ओलांडताना दुर्घटना घडतेच. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जरा वेळही थांबायचं नसल्या कारणाने अनेकदा लोक भरवेगात रेल्वे फाटक क्रॉस करायचा प्रयत्न करतात. पण अशाच वेळीच बऱ्याचदा दुर्घटना घडतात आणि अगदी जीवही जातो. या व्हिडीओ मधूनही हेच दिसून येत आहे की आपण अति घाई करू नये नाही तर संकट पुढे उभे असतेच.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये ?
डॉक्टर अजयता या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘कधी सुधारणार आपण?’ असं डॉ.अजयता यांनी या पोस्टला कॅप्शन दिल आहे. यामध्ये दिसून येत आहे की रेल्वे फाटक पडणार आहे तरी लोक क्रॉस करण थांबवत नाहीयेत. शेवटी काही वेळाने फाटक पडत पण तरीही एक तरुण भरवेगात बाईक घेऊन फाटकाजवळ येतो आणि फाटकाच्या रॉडला आदळतो. पटकन रेल्वे रूळ क्रॉस करण्याच्या नादात त्याने बाईकच्या स्पीड वाढवला पण तो स्पीड त्याच्या जीवावर बेतला असता.
व्हिडीओ इथे बघा:
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
या व्हिडीओला आतापर्यंत १२२.१ हजार लोकांनी बघितलं आहे. तर अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांनी आपण कधीच सुधारणार नाही असं म्हंटल आहे. तर काहींनी हा व्हिडीओ अनेकांनी बघितला पाहिजे तरच लोकांना असं वागू नये हे लक्षात येईल अशी कमेंट केली आहे.
तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?