एटीएम फोडून चोरी केल्याच्या अनेक घटना आपण वारंवार वाचतो. मात्र सोशल मीडियावरील एका व्यक्तीचा एटीएम फोडल्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. अनेकदा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर काळजीपूर्वक आपण स्थिती हाताळतो. पासवर्ड टाकण्यापासून डेबिट कार्ड टाकण्याच्या ठिकाणी काही संशायस्पद लावलं आहे का? याची काळजी घेतो. मात्र बऱ्याचदा असं होतं की एटीएम मशिनमध्ये कार्ड अडकतं. त्यामुळे आपल्याला एकदम धक्का बसतो. कारण पूर्ण दिवसभर अडकलेलं कार्ड कसं मिळवायचं यासाठी प्रयत्न करावा लागतो. बँकेच्या कॉल सेंटरशी बातचीत करून ते मिळवण्याची प्रक्रिया करतो. सरतेशेवटी आपल्या खूप आटापीटा केल्यावर कार्ड मिळतं. अनेकदा कार्ड ब्लॉक करण्याची वेळ येते. तसेच नविन कार्ड मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती एटीएम बूथमध्ये असल्याचे दिसत आहे. कार्ड अडकल्याने थोडा अस्वस्थ दिसतो. एटीएम बुथमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार चित्रित झाला आहे. कार्ड मिळवण्यासाठी माणूस वारंवार मशीन स्क्रीनचा भाग काढण्याचा प्रयत्न करतो. शेवटी ते काढण्यात त्याला यश मिळते. यानंतर तो आजूबाजूला पाहतो आणि मशीनच्या आत डोकावून त्यात हात घालतो. आतून रोख नाही तर डेबिट कार्ड बाहेर काढतो आणि खिशात ठेवतो. यानंतर, तो वर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराकडे पाहतो आणि विचित्र प्रतिक्रिया देतो. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. सोशल मीडियावर लोक त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत १ कोटी ९२ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून मजेशीर कमेंट्स करत आहेत. तर काही जण त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video atm machine broken by a person rmt