सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काय दिसेल याबद्दल काहीही सांगता येत नाही. रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी लोकांचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी सीटसाठी लढणाऱ्या लोकांचा व्हिडीओ व्हायरल होतो. याशिवाय सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पण, आता एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर एका ऑटोचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. चला तर मग तुम्हाला व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल सांगतो.
ऑटो हे वाहतुकीचे एक महत्त्वाचे साधन आहे. नोकरी, शाळा, कॉलेज या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी अनेकदा आपण ऑटो रिक्षाचा वापर करतो आणि प्रवास सोयीस्कर करतो. तर आज रिक्षासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही आतापर्यंत रेल्वेतील गर्दीचे व्हिडीओ पाहिले असतील. रेल्वेत गर्दीमुळे अनेक लोक टॉयलेटमध्ये किंवा जमिनीवर झोपून प्रवास करताना दिसतात. पण, आज तुम्हाला चक्क ऑटोमधील गर्दीचा व्हिडीओ दाखवणार आहोत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ऑटोमध्ये बसलेल्या प्रवाशांची संख्या बघून नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
(हे ही वाचा: धावत्या रेल्वेची हत्तीला धडक! आधी उठला व मग रुळांवर पडला अन्… हृदय पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल )
व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसले?
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका ऑटोचा आहे. वास्तविक एक व्यक्ती ऑटो प्रवाशांच्या थांबायच्या ठिकाणी घेऊन येतो आणि ऑटो एका ठिकाणी थांबवितो, जिथे प्रवासी एक एक करून उतरतात. ऑटोमध्ये बसलेले सर्व प्रवासी मित्र वाटतात. आता आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हिडीओ इतका व्हायरल का होतोय. ऑटोमध्ये तीन जणांना बसण्याची परवानगी असली तरी व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या ऑटोमधून बरेच लोक उतरताना दिसतात. ऑटो प्रवाशांनी खचाखच भरलेला असतो. या छोटयाशा ऑटोमधून आठ लोक उतरतात. या ऑटोमध्ये तीन मुलं आणि पाच मुली बसलेले असतात. कसेतरी जागाकरुन ते बसले असावेत. आता या आॅटोचा व्हिडीओ पाहून सर्व नेटकरी थक्क झाले आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर danger_trolls नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडीओला ३९ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “हा आठ सीटर ऑटो आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “ही ऑटो ड्रायव्हरची शक्ती आहे.” तिसऱ्या युजरने लिहिले, “ही रिक्षा आहे की तळघर?” तर अनेक वापरकर्त्यांनी हसणारे इमोजी शेअर केले आहेत.