जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही. आपण भारतीय लोक अशा अशा ट्रीक्स शोधून काढतो की ज्या पाहून अमेरिकन लोकं सुद्धा थक्क होत असतील. शिवाय कोणतही काम सोपं आणि पटकन व्हावं यासाठी अनेकदा देशी जुगाडांचा शोध लावला जातो. आजकाल अनेक लोकांनी आपली अवघड कामं सोपी करण्यासाठी केलेल्या विविध जुगाडांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकदा आपणाला आश्चर्याचा धक्का बसतो.असाच एक भन्नाट जुगाड आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या देसी जुगाडचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
तरुणाचा भन्नाट जुगाड –
देसी जुगाडचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एका टाकाऊ बाटलीपासून स्वयंचलित दरवाजा बनवण्यात आला आहे. पाण्याची भरलेली बाटली दरवाजाच्या वरच्या बाजूला दोरीच्या सहाय्यानं बाधली आहे. ही बाटली दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला सोडली आहे. जसे लोक खोलीतून बाहेर येतील तसा हा दरवाजा बाटलीच्या बजनाने आपोआप बंद होणार. हल्ली दरवाजाला ऑटोमॅटीक सीस्टिम लावण्यात येते, मात्र तरुणाचा स्वस्तात मस्त जुगाड पाहून आनंद महिंद्राही खूश झाले आहेत.
पाहा व्हिडीओ –
या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले असून उद्योगपती आनंद महिंद्रांनीही अनोख्या जुगाडाचं कौतुक केलं आहे. महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले आहे की, केवळ दोन रुपयात या तरुणानं हा भन्नाट जुगाड केला आहे.