Viral Video: आजकालची लहान मुलं खूप अॅडव्हान्स झाली आहेत. त्यांना आपल्या आवडी-निवडी या सर्व गोष्टी अचूक कळतात. सोशल मीडियावरही ते आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचे विविध रील्स बनवून शेअर करीत असतात. इतकंच नव्हे, तर घरातील कार्यक्रमांमध्येही ते आपली कला सादर करताना दिसतात. आजपर्यंत तुम्ही व्हायरल झालेले अशा अनेक चिमुकल्यांचे सुंदर व्हिडीओ पाहिले असतील. आताही अशाच एका चिमुकलीचा एक डान्स खूप चर्चेत आहे, जो पाहून तुम्हीही तिचे कौतुक कराल.
लग्नसराईचे दिवस सुरू झाले की, सोशल मीडियावरही लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि विविध फोटोंचा महापूर येतो. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमती-जमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात चिमुकली वधू-वराच्या स्वागतासाठी डान्स करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली वधू आणि वराचे स्वागत करताना लग्नसोहळ्याच्या ठिकाणी “जमाई राजा राम मिला”, या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी लग्नमंडपातील सर्व मंडळी आणि वधू-वर तिच्याकडे कौतुकानं पाहतात. लोकांची मोठी गर्दी पाहूनही चिमुकली न घाबरता, तिचा डान्स सुरूच ठेवते. सध्या तिचा हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sachi_.1505 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करीत आहेत. एकानं लिहिलंय, “सुंदर नाचली.” दुसऱ्यानं लिहिलंय, “जमाई राजा झोपेत आहेत वाटतं.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “छान डान्स केलास बाळा.”