Viral Video: सोशल मीडियाचा वापर आपण आपलं मनोरंजन करण्यासाठी करतो. ज्यावर कधी चांगले तर कधी वाईट कंटेंटवरील आधारित व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा सोशल मीडियावर माणसातील माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या घटना, तर कधी पालक आणि त्यांच्या मुलांमधील प्रेमाचे क्षण दाखवणाऱ्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक बाप आणि त्याच्या मुलीच्या नात्यातील निखळ प्रेम पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाप-लेकीचं नातं नेहमीच खूप खास समजलं जातं. बाप गरीब असो वा श्रीमंत, तो आपल्या लेकीला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. असं म्हणतात, एखाद्या मुलीवर तिच्या वडिलांएवढे प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. शिवाय मुलीदेखील आपल्या वडिलांना खूप जीव लावतात. त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करतात, वडिलांनी दिलेली प्रत्येक गोष्ट मुलीसाठी खूप खास आणि लाखमोलाची असते. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीही भारावून जाल.

आई-वडिलांसाठी मुलगा असो किंवा मुलगी दोन्हीही सारखेच असतात. पण, अनेकदा आपल्या मुलांच्या वागण्यावरून त्यांचे आई-वडिलांप्रती असलेले प्रेम पाहायला मिळते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत हा फरक स्पष्ट होताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरातीय डायनिंग टेबलवर बाबा मुलांबरोबर नाश्ता करण्यासाठी बसले असून यावेळी व्हिडीओच्या आधीच्या क्लिपमध्ये बाबा मुलाबरोबर बसलेले दिसत आहेत. यावेळी दोघांचे झाकलेले ताट उघडून पाहतात, ज्यात वडिलांचे ताट रिकामे दिसते तर मुलाच्या ताटात दोन केक दिसतात. यावेळी बाबा त्याला माझ्या ताटात काहीच नाही असं म्हणतात, पण तो दुर्लक्ष करून केक खायला सुरुवात करतो. त्यानंतर पुढच्या क्लिपमध्ये बाबा मुलीबरोबर बसलेले दिसत आहेत. यावेळी पुन्हा ते झाकलेले ताट उघडून पाहतात, यावेळीसुद्धा बाबांचे ताट रिकामे दिसते आणि मुलीच्या ताटात दोन केक दिसतात. ते मुलीलादेखील माझ्या ताटात काहीच नाही म्हणतात. यावेळी मुलगी पटकन तिच्या ताटातील एक केक बाबांना खायला देते. मुलगी आणि वडील यांच्या नात्यातील प्रेम दाखवणारा हा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरील कॅप्शनमध्ये, “मुलींना शिकवावं लागत नाही, त्या वेळेआधीच मोठ्या होतात,” असे म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @unique_girl_writes_100k या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला मिलियन्समध्ये व्ह्युज आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हिडीओवर एका युजरने लिहिलंय की, “मुली खरंच खूप प्रेमळ असतात”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “म्हणूनच मुलींना पप्पांची परी म्हटलं जातं”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “मुलीशिवाय घर सुनं सुनं वाटतं.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video baby girl sharing food with dad emotional video viral sap