साप पाहून भल्याभल्यांची हालत बिघडते. सापाला आपल्या आजूबाजूला रेंगाळताना पाहणे एका भयानक स्वप्नापेक्षा कमी नाही. या पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये सापांचा समावेश होतो. साप पाहून माणसांबरोबरच प्राण्यांचीही अवस्था दयनीय होते. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मगर आणि साप अत्यंत धोकादायक मानले जातात. या पृथ्वीतलावर असे काही साप आढळतात, जे अतिशय विषारी आहेत. जर हे साप चावले तर काही क्षणातच समोरच्याचा मृत्यू होऊ शकतो.
काही साप अत्यंत विषारी आणि धोकादायक असतात. म्हणूनच नेहमी सापांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही सोशल मीडियावर सापांशी संबंधित अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहिले असतील. सापांशी संबंधित व्हिडीओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ खूपच आश्चर्यकारक असतात. आजकाल असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
VIDEO: RRR चित्रपटाची क्रेझ; मुलांनी चित्रपटगृहातच केली नाचायला सुरुवात; जबरदस्त डान्स पाहून नेटकरीही झाले खुश
किली पॉलच्या कुऱ्हाडीसोबच्या अॅक्शन सीनवर नेटकरी झाले फिदा! बघा Viral Video
व्हिडीओमध्ये तुम्ही एका मुलीच्या केसात सापाचे बाळ अडकलेले पाहू शकता. हे सापाचे मुल मुलीच्या केसात कसे अडकले ते कळले नाही. या व्हिडीओमध्ये दिसणारी सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथे लोक साप पाहून घाबरून जातात, तिथे मुलीला या सापाची अजिबात भीती वाटत नाही. मुलीला साप चावेल याची अजिबात भीती वाटत नाही.
व्हिडीओमधील मुलगी अतिशय आरामात तिच्या केसांतून सापाला बाहेर काढताना दिसत आहे. साप अशाप्रकारे अडकला आहे की तो सुटण्याचे नाव घेत नाही. हा धक्कादायक व्हिडीओ snake_unity नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.