काही दिवसांपासून एक व्हिडीओ आपण सोशल मिडियामध्ये पाहिला असेल. या व्हिडीओमध्ये एक लहानगी चिमुकली थेट हत्तीणीच्या कासेला तोंड लावून दूध पीत असताना दिसत आहे. निश्चितच सर्वांना प्रश्न पडला असेल की हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? दरम्यान , याच उत्तर देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत. भगवान कृष्ण थेट गाईच्या कासेला तोंड लावून दूध प्यायचे अशी पुराणातील गोष्टी आपण सतत ऐकत असतो. पण हत्तीणीचं दूध पिलेलं तुम्ही कधी ऐकलंय का नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. या व्हिडीओमध्ये अवघ्या तीन वर्षांची चिमुकली भल्यामोठ्या हत्तीणीच्या खाली उभी राहून दूध पिताना दिसून आली. हा व्हिडीओ पाहून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल.

माणूस असो किंवा प्राणी…त्यांच्यातील आईची ममता ही सारखीच. असं म्हटलं जातं की हत्ती हा सगळ्यात मायाळू प्राणी आहे. परंतु, ज्यावेळी त्याला राग येतो त्यावेळी तो कशाचाही विचार न करता थेट एखाद्यावर हल्ला चढवतो. सोशल मीडियावरही हत्तीच्या संतापाचे किंवा त्याने घातलेल्या धुडगूसचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो हत्तीणीच्या रागाचा किंवा धुडगूसचा नव्हे तर ममतेचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आसाममधल्या गोलाघाट जिल्ह्यातल्या आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बकरीसोबत व्हिडीओ शूट करणं पडलं महागात, मग पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

या व्हायरल व्हिडीओमधल्या या तीन वर्षाच्या चिमुकलीचं नाव हर्षिता बोरा असं आहे. एका मोकळ्या अंगणात ही चिमुकली या भल्यामोठ्या हत्तीणीसोबत खेळताना दिसून येत आहे. खेळता खेळता ही चिमुकली हत्तीणीचं दूध पिण्याचा प्रयत्न करताना दिसून येतेय. खेळत असताना हर्षिता कधी कधी हत्तीणीला हात लावते. कधीकधी ती तिच्या खाली उभी राहून खेळते. हत्तीणीचा साथीदार या मुलीचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर नेटकरी सुद्धा अनेक चांगल्या कमेंट्स केल्या.

आणखी वाचा : या कलाकाराच्या कलाकृतीला सलाम!, गोठलेल्या बर्फात बनवला महाकाय साप, पाहा हा VIRAL VIDEO

ही चिमुकली हत्तीणीचं दूध पिण्याचा प्रयत्न करत असताना पाहून मनात एक भीती येऊ लागते की आता ही हत्तीणी या चिमुकलीला काही दुखापत तर नाही ना करणार? मनात कोणतीही भीती न ठेवता ही चिमुकली हत्तीणीच्या खाली उभी राहून दूध पिण्याचा प्रयत्न करू लागते. हे दृश्य पाहून सारेच जण हैराण होऊ लागले आहेत. हा चिमुकली हर्षिता या हत्तीणीला प्रेमाने बीनू म्हणते. आसाममधील गोलाघाट हा जिल्हा हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. याचा व्हिडीओ Lohit Bora नावाच्या युट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : असा खतरनाक नागिन डान्स तुम्ही कधीच पाहिला नसेल, VIRAL VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चक्क विमानातच एअर होस्टेसने केला ‘Pushpa’ डान्स, एका चुकीमुळे आली चर्चेत, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. या व्हिडीओला लोकांची इतकी पसंती मिळतेय की, आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाख ४४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

गेल्या काही दिवसांत मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्षाच्या परिस्थितीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. या भागातील काही घटनांमध्ये हत्तींनी माणसांचा बळी सुद्धा घेतला. अशा परिस्थितीत हत्तीणीसोबतच्या मुलीचा हा व्हिडीओ खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे.