सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर आपल्याला खळखळून हसवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही काही शेळ्या पाहू शकता. या शेळ्या आपल्याच धुंदीच उभ्या असलेल्या दिसतात. या शेळ्या इतक्या हूशार असतात की पार्सल ट्रक पाहून बेशुद्ध होण्याचं नाटक करू लागतात. त्यांचा हा नौंटंकीपणा लोकांना फार आवडू लागलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या हा व्हिडीओ व्हायरल होग नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला असलेली हिरवळ दाखवण्यात आली आहे. इथे काही शेळ्या चरताना दिसतात. काही वेळाने तिथे एक ट्रक त्यांच्याजवळून येतो. पार्सल ट्रेक आलेला पाहताच या सर्व शेळ्या आपापल्या जागेवर पडतात आणि बेशुद्ध पडल्याचे नाटक करतात. हे पार्सल ट्रेक कदाचित या शेळ्यांना घेण्यासाठी आलेलं असावं, असं या शेळ्यांना वाटलं असेल. म्हणून ट्रकमध्ये न जाण्यासाठी या हूशार शेळ्यांनी अशी युक्ती वापरली.

आणखी वाचा : यापैकी एक अंड थोडं वेगळं आहे! यामागचं कारण जाणून घेण्यासाठी पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

हा व्हिडीओ पाहण्यासाठी फारच मजेदार आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहताना व्यक्ती कोणत्याही मूडमध्ये असला तरी त्याच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ शेअर होताच बघता बघता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह आवरू शकत नाहीत.

हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक या व्हिडीओवर अनेक विनोदी कमेंट्स शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहण्यासाठी जितका मजेदार आहे, तितक्याय या व्हिडीओवरील कमेंट्सही.