इंटरनेट हे एक मनोरंजक ठिकाण बनलंय, जिथे वेगवेगळ्या व्हायरल व्हिडीओमधून कधी कुणाला हसू आवरता येत नाही तर कुणाला अश्रु आवरत नाही. एका बटणाच्या क्लिकवर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होत असते. सोशल मीडियावर अगदी गोंडस बाळांपासून ते अगदी प्राण्यांपर्यंत सर्वांचे व्हिडीओ दररोज अपलोड असतात आणि त्याला लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती सुद्धा मिळत असते. आतापर्यंत आपण अनेकदा हालाकीच्या परिस्थितीसमोर हार मानत टोकाचं पाऊल उचलणारी माणसं पाहिली असतील. परंतू काही लोकं ही काहीही झालं तर संकटासमोर गुडघे टेकायचे नाहीत या हेतूनेच आयुष्यभर संघर्ष करत असतात. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधही ही महिला बंगळुरमध्ये राहणारी आहे. रस्त्यावर इडली-डोसा विकतानाचा तिचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. जसजसा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यानंतर तिच्या एका अनोख्या संघर्षाची कहाणी ऐकून नेटकरी भावूक झाले आहेत. त्यांच्या कहाणीने लाखो लोकांची मन जिंकली आहेत. ही महिला केवळ पाच रूपयांमध्ये इडली-डोसा विकतेय.

आणखी वाचा : असा खतरनाक नागिन डान्स तुम्ही कधीच पाहिला नसेल, VIRAL VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

हा व्हिडीओ @youtubeswadofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये ही महिला तिच्या घराबाहेर इडली आणि डोसा घेऊन बसलेली दिसून येत आहे. ती या इडल्या अडीच रुपयांना आणि डोसा ५ रुपयांना विकतेय. दक्षिण भारतातला हा प्रसिद्ध पदार्थ ऑर्डरनुसार ताजं ताजं बनवलं जातं. घराच्या पहिल्या मजल्यावर इडली आणि डोसा बनवला जातो आणि खालच्या बाजूला बादलीतून वाटला तो लोकांना वाटला जातो.

आणखी वाचा : चक्क विमानातच एअर होस्टेसने केला ‘Pushpa’ डान्स, एका चुकीमुळे आली चर्चेत, पाहा हा VIRAL VIDEO


@youtubeswadofficial नुसार, ही महिला गेल्या ३० वर्षांपासून खाद्यपदार्थ विकत आहे. ही महिला बंगळुर मधल्या बसवानगुडी, विश्वेश्वरपुरा, पार्वतीपुरम, ६३, ६६ इथे राहतात. अनेकदा अनेक लोक त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडतात. नोकरीनिमित्ताने कुटुंबियांपासून दूर राहून ते आपल्या उपजिविकेसाठी धडपडत असतात. अशा परिस्थितीत त्यांना दोन वेळचं जेवणं मिळावं तेही कमी किंमतीत, यासाठी या महिलेने कमी किंमतीत इडली-डोसा विकण्याचं काम सुरू केलंय. केवळ अडीच रूपयांमध्ये इडली आणि पाच रूपयांत डोसा मिळत असल्याने लोक देखील या महिलेकडे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. अगदी तृप्त होऊन लोक या महिलेकडे कमी किंमतीत दोन वेळचं जेवण करताना पाहून या महिलेला ही समाधान वाटत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नेत्रहीन व्यक्तीची ‘डोळस’ कामगिरी! पाहू शकत नसला तरी स्केटिंग करत दाखवला पराक्रम

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : भिकाऱ्यासोबत पंगा घेतला, तर त्याने नोटांचा अक्षरशः पाऊसच पाडला… VIRAL VIDEO पाहून सारेच हैराण

हा व्हिडीओ अपलोड केल्यापासून आतापर्यंत त्याला ५ लाख ६२ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाले असून तो ४.८ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे! या व्हिडीओमधल्या अम्माच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. एका व्यक्तीने लिहिले, “सर्वात प्रतिभावान लोक सर्वात सामान्य असतात. त्यांना सहज ओळखणं कठीण आहे.” “चांगलं काम करत रहा” असं आणखी एका दुसऱ्या युजरने म्हटलंय. “प्रेरणादायी, मला तुमचा अभिमान आहे. मित्रांनो, बघून काहीतरी शिका.” असं देखील आणखी एका दुसऱ्या युजरने म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video bangalore based amma sells idlis and dosas for rs 5 internet is moved by her story prp