Ganeshotsav News : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा गणपती बाप्पाचं आगमन ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा घरोघरी विराजमान होणार. खरं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बाप्पा आवडतो त्यामुळे गणेशोत्सवात तो उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येतो.
असं म्हणतात, बाप्पा हा सगळीकडे असतात. घरी, मंदिरात, तुमच्या आजुबाजूला, पानाफुलात, झाडेझुडपात, लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अगदी माणसात सुद्धा तुम्हाला बाप्पा दिसू शकतो, फक्त बघणाऱ्याकडे ती नजर असावी लागते. सध्या गणेशोत्सवामुळे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एका झाडाच्या वेलीमध्ये बाप्पा दिसेल. सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तर तु्म्हाला चक्क बाप्पााचा चेहरा वेलीमध्ये दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओम्ये तुम्हाला एक वेल दिसेल या वेलीवर जेव्हा कॅमेरा झुम केला जातो तेव्हा वेलीमध्ये चक्क बाप्पाचा चेहरा दिसतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल आणि बाप्पा सगळीकडे असतो, असे तुम्हाला वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “तो सगळीकडे आहे.”
हेही वाचा : फक्त एका सेकंदाची किंमत पहा! …अन् माणूस मगरीच्या तावडीतून सुटला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
पाहा व्हायरल व्हिडीओ
indian_illustrator या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही काय पाहिलं?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे बघायला पण नजर लागते भावा ❤️ खरा कलाकार” तर एका युजरने लिहिलेय, “व्वाह ! उदयभान हीच असते एका खऱ्या कलाकाराची जाणीव. गणपती बप्पा मोरया. हे चित्र Pause करुन त्याला तुझ्या illustration च्या फटकाऱ्यांनी आकार दे” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुमच्यासारख्यांना तो दुर्लक्ष करत राहिला… हसणाऱ्यांनो, त्यानं निसर्गात देव पाहिला…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी गणपतीविषयी प्रेम व्यक्त केले आहे. काही युजर्सनी ‘गणपती बाप्पा मोरया’ लिहिलेय.