Bear attacked: वन्य प्राणी, वन्य जीवन याविषयी अनेकांना आकर्षण असतं. प्राण्यांच्या जीवनाशी निगडित गोष्टी जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. सोशल मीडियावरही प्राण्यांचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत असतात. खास करुन प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडीओ. यामध्ये प्राण्यांचा निराळा अवतार आपल्याला पहायला मिळतो.वेगवान प्राण्यांनी केलेली शिकार यासारख्या व्हिडिओला तर हजारोच्या संख्येने व्ह्यूज असतात. मात्र सध्या सोशल मिडियावर एक आगळावेगळाच व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये एक अस्वल चक्क एका पर्यटक महिलेवर प्रचंड रागावलेला दिसत आहे.
सेल्फीच्या नादात अस्वलाचा तरुणीवर हल्ला
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी अस्वलासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होती. मग काय, अस्वलानेही तिला आपली ताकद दाखवून दिली. त्याने तरुणीला अशा प्रकारे घाबरवलं की, जीव वाचवून ती पळत सुटली. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक महाकाय अस्वल रस्त्याच्या कडेला बसलं आहे आणि त्याच्या मागे एक तरुणी उभी आहे. समोर एक व्यक्ती त्या तरुणीचे फोटो काढत होती. यादरम्यान तरुणी वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तिने अस्वलाच्या दिशेने पाऊल टाकताच अस्वलाने तिचा पाठलाग केला. त्यानंतर ती पळत सुटली आणि काही अंतरावर जाऊनच उभी राहिली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video viral: इटलीत पुराचं थैमान! बुडणाऱ्या माय-लेकीला स्वत:चा जीव धोक्यात घालून दिला मदतीचा हात
ती नशीबवान होती की अस्वलाने तिच्यावर हल्ला केला नाही, अन्यथा तिचा जीव धोक्यात आला असता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, काहीजण यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.