Viral Video: जेवण बनवताना, फोडणी देताना, तर पोळी शेकताना अनेकदा स्वयंपाकघरात धूर होतो. तर घरातील हा धूर वा उष्ण हवा बाहेर घालवण्यासाठी एक्झॉस्ट फॅन (Exhaust Fan ) मदत करतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात एकतरी एक्झॉस्ट फॅन हा असतोच. तर सोशल मीडियावर आज असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत एका व्यक्तीने एक्झॉस्ट फॅनचा अनोखा वापर केला आहे आणि त्याचे कूलरमध्ये रूपांतर केलं आहे. नक्की व्यक्तीने काय जुगाड केला आहे चला पाहू.
एका व्यक्तीने स्वतःला आणि संपूर्ण कुटुंबाला उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था केल्याचे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. व्यक्तीने आपल्या घरात सिमेंटची मदत घेऊन एक कायमस्वरूपी कुलर बनवला आहे. घरातील एका खिडकीला जोडून दोन भिंती उभारल्या आहेत. खाली पाणी टाकण्यासाठी टाकीची व्यवस्था करण्यात आली आहे. खिडकीत छोटा एक्झॉस्ट फॅनसुद्धा बसवण्यात आला आहे. कुटुंबासाठी कायमस्वरूपी कूलर कसा बनवला एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.
हेही वाचा…याला म्हणतात शिस्त..! वाहतूक कोंडीवर शोधला उपाय ; VIDEO चं होतंय जगभरात कौतुक
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जसं कूलरला जाळी असते, तसं येथे गार गवत लावून त्याला छिद्र पाडली आहेत व सिमेंटचा कूलर बांधण्यात आला आहे. कशाप्रकारे हा कूलर बांधला हे टप्प्याटप्प्याने व्हिडीओत दर्शविले आहे. हा कूलर कसा काम करतो, याबद्दल व्हिडीओत दाखवलं नसले तरीही या उपकरणाने लोकांना नक्कीच आश्चर्यचकित केले आहे असे म्हणायला हरकत नाही. एक्झॉस्ट फॅनचा असाही वापर केला जाऊ शकतो, असा आजवर तुम्ही नक्कीच विचार केला नसेल; जो या व्यक्तीने करून दाखविला आहे.
सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @kushwah_ji_ke.chore’s इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. काही युजर्सचं म्हणणं आहे की, एवढ्या खर्चात पाच हजारांचा कूलर आला असता. तर अनेक युजर्सचं म्हणणं आहे की, सिमेंटच्या बनवलेल्या टाकीत एकदा पाणी ओतलं तर पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत पुन्हा बघण्याची गरज नाही; आदी अनेक कमेंट व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत.