Viral Video: आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, त्या व्यक्तीने आपल्याबरोबर नेहमी आपल्या सुख-दुःखात राहावं, आपली सगळी स्वप्नं पूर्ण करावी, आपली काळजी घ्यावी असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. या सर्व इच्छा पूर्ण करणारा जोडीदार अनेक मुलींच्या नशिबात असतो. पण, कधी कधी नात्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण होतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं सुरू होतात आणि हळूहळू हेच भांडण हाणामारीपर्यंत पोहोचते. प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याच्या किंवा तिला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याच्या अनेक घटना आजपर्यंत तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
नातं कुठलंही असो, पण त्यामध्ये रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. परंतु, अनेक जण रागात समोरच्या व्यक्तीवर हात उचलतात, ज्यामुळे नातं अधिक कमकुवत होतं. सोशल मीडियावर कधी पालकांना मुलांना मारहाण केल्याचे किंवा पती-पत्नीमध्ये झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण, आता समोर आलेल्या व्हिडीओतील एक तरुण त्याच्या प्रेयसीला माराहाण करताना दिसत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये प्रेयसी आणि प्रियकर एका ठिकाणी बसले असून यावेळी त्यांच्यामध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद सुरू होतो, ज्यामुळे प्रियकर प्रेयसीवर हात उचलतो. यावेळी तो तिच्या कानाखाली वाजवतो आणि नंतर तिचे केस ओढून तिला कोणत्यातरी गोष्टीवरून जाब विचारतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी यावर अनेक कमेंट्स करत आहेत.
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओवरील कॅप्शनमध्ये, “तिला मारण्यात कसली आलीय मर्दांगी, खरा पुरुषार्थ तर तिला जपण्यात आहे” असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आले असून अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “नामर्द आहे हा”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “कितीही मुलगी चुकीचं वागली तरी तिच्यावर हात उचलणे म्हणजे स्त्रीचा अनादर केल्यासारखं आहे; त्याने तर प्रेम केलंय, मग तर प्रेमात रिस्पेक्ट फार महत्त्वाचा आहे.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप वाईट आहे हे.”