Shocking video: काहीच दिवसांपूर्वी मुंबईतलं लालबाग अपघाताने हादरलं. बेस्टची बस अनियंत्रित झाली आणि लालबागमध्ये उत्सवाच्या रंगाचा बेरंग झाला. बेस्टचा अपघात झाल्याने ९ जण जखमी झाले. या घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला. २८ वर्षीय नुपूर मणियारचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. नुपूरच्या मृत्यूसाठी बेस्ट बसमधला मद्यधुंद प्रवासी कारण ठरला. मद्यधुंद प्रवासी आणि चालक यांच्यात वाद झाला. वाद घालणाऱ्या प्रवाशाने बेस्ट बसचं स्टिअरिंग खेचलं. त्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि बसने ९ जणांना उडवलं. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे, यामध्ये दोन तरुणांनी धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीय. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
in nashik Bus lost control at highway station, crashing into control room woman died and passengers injured
नाशिकमध्ये स्थानकात इ बसची थेट नियंत्रण कक्षास धडक… विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू , तीन जखमी

लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात सिटी बसमध्ये गुंडगिरी केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोन तरुणांनी ड्रायव्हरला चालत्या बसमध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ मिल परिसरात दोन लोक चालत्या बसमध्ये चढले आणि त्यांनी चालकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बसमध्ये बसलेल्या काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्या लोकांनी त्यांना धमकावले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे लोक ड्रायव्हरला मारहाण करत असताना कंडक्टर शांतपणे बघत राहिला, त्याने ड्रायव्हरला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही.

आधी लालबाग आता भोपाळमध्ये घडलेल्या घटनेवरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अशाप्रकारची गुंडगीरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा>> Shocking: तुम्हालाही व्हॅनिला आईस्क्रीम खायला आवडते का? २०२५ ची एक्सपायरी डेट, तरीही डब्यात काय आढळलं पाहा

ही घटना मंगळवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. विवेक उधवानी असे ड्रायव्हरचे नाव असून हल्ला करणारे दोन्ही तरुण हे खासगी बसचे कर्मचारी आहेत.

आरोपी दोघांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. पण रेकॉर्डिंग आधीच सर्व्हरमध्ये सेव्ह होते. या घटनेनंतर बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Sudhirsingh077 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Story img Loader