Viral Video: हल्ली सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. त्यातील काही व्हिडीओ निरर्थक विषयांवर आधारित असतात, ज्याला व्ह्युज लाखो आले असले तरीही त्यातून शिकण्यासारखे किंवा मनोरंजन होईल, असे काहीच नसते. पण, अनेक युजर्स असेही असतात की, जे सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कन्टेंट शेअर करतात; ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक लहान मुलांना त्यांच्या बालपणापासूनच आपली आवडती कला कोणती, छंद कोणते हे कळतं. त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी सुंदर डान्स करताना दिसतं, तर कधी कोणी सुमधुर आवाजात गाणं गाताना दिसतं. त्याशिवाय अनेक जण अभिनयही करताना दिसतात. सध्या दोन शालेय विद्यार्थिनींचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात त्या खूप सुंदर अभिनय करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन विद्यार्थिनींनी शाळेच्या गणवेशात ‘अनन्या, अनन्या सावध हो जरा’ या गाण्यावर अभिनय करीत आहेत. यावेळी त्या दोघींच्या चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खरं तर, हे गाणं ‘मी होणार सुपरस्टार’ या स्टार प्रवाहवरील शोमधील आहे. जे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @its__tejuvedu26 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत तीन दशलक्षांहून व्ह्युज आणि अनेक लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “मी १० वेळा बघितला तरी बोर होत नाही व्हिडीओ बघू.न सारखं बघू वाटत आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “लय भारी तुमच्या दोघींनापन तोड नाही.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “अप्रतिम अभिनय केला आहे दोघींनी.”