Viral Video: हल्लीची मुलं लहानपणापासूनच आपल्या आवडीचे क्षेत्र निवडतात. मग ही मुलं त्या निवडलेल्या क्षेत्रात वाहवा वा प्रसिद्धी मिळविण्यासाठी भरपूर मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी सुंदर डान्स करताना दिसतं, तर कधी कोणी गाणं गाताना, चित्र काढताना दिसतं. त्याशिवाय अनेक जण अभिनयात बाजी मारताना दिसतात. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे.

संगीत, अभिनय याप्रमाणेच नृत्यदेखील अनेकांची आवडती कला आहे. सोशल मीडियामुळे अशा अनेकांची कला जगासमोर येऊ लागली आहे. त्यामुळे काही सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून तुम्ही त्या चिमुकलीचे निश्चित कौतुक कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली ‘गोरियां गल्लां’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकली करीत असलेला डान्स अन् तिच्या चेहऱ्यावरील हावभाव कमालीचे आहेत. तिच्या डान्समधील प्रत्येक स्टेपमध्ये वेगळेपणा पाहायला मिळतोय. त्यामुळे तिच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा: ‘एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं…’ वाइल्डबीस्ट प्राण्यावर सिंहाने केला क्रूर हल्ला; VIDEO पाहून फुटेल घाम

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @barkat.arora या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत जवळपास आठ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि पाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “छोटी तुझा डान्स खरंच खूप छान आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूपच कडक डान्स.” तिसऱ्याने लिहिलेय, “एक्स्प्रेशन्स आणि डान्स कमाल.” तसेच, आणखी अनेक युजर्स चिमुकलीचे कौतुक करताना दिसत आहेत.

Story img Loader