Viral Video: समाजमाध्यमांवर फक्त व्हिडीओ, व्लॉग बनवून, त्यावर लाखो रुपये कमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेक लोक आपली नोकरी, व्यवसाय सोडून दिवसभर रील्स बनवणे, पर्सनल व्लॉग तयार करणे अशा गोष्टी करतात. पण असेही अनेक लोक आहेत की, जे आपली नोकरी, व्यवसाय करीत मिळालेल्या वेळेत रील्स बनवतात. रील्सद्वारे ते डान्स व अभिनय करणे, गाणी गाणे अशा कला सादर करीत असतात. कधी डॉक्टर, कधी ड्रायव्हर, तर कधी घरकाम करणाऱ्या महिला अशा अनेकांना आपण रील्स बनविताना पाहिले आहे. पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक पोलिस सुंदर गाणे गाताना दिसत आहे.
पोलिस म्हटले की, बऱ्याचदा विनाकारण भीती वाटते. पण पोलिसांमधील अनेक कलागुणदेखील विविध व्हिडीओंद्वारे पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी पंढरपूरच्या वारीमध्येदेखील बंदोबस्तासाठी असलेल्या अनेक पोलिसांना आपण फुगडी खेळताना, अभंग म्हणताना पाहिले होते. दरम्यान, सध्या अशाच एका पोलिसाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो अरिजित सिंहचे गाणे गाताना दिसत आहे.
पोलिसाने गायलं सुंदर गाणं
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कारमध्ये एक पोलिस बसला असून, तो यावेळी अरिजित सिंहचे ‘शायद कभी ना कह सकूँ मैं तुमको’ हे गाणे गाताना दिसत आहे. या पोलिसाचा आवाज जवळपास अरिजित सिंहच्या आवाजासारखाच आहे. या पोलिसाचे नाव रजत राठौड असून, त्याने गायलेली अशा प्रकारची अनेक गाणी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे करण्यात आली आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rajat.rathor.rj या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने लिहिलेय, “आता अरिजित सिंहची पोस्ट तुम्हाला मिळेल.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुम्ही चुकून पोलिस झालात, गायक व्हायला हवं होतं.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओदेखील खूप व्हायरल होणार.” आणखी एकाने लिहिलेय, “सुंदर आवाज आहे तुमचा सर.” आणखी एकाने लिहिलेय, “किती जबरदस्त आवाज आहे तुमचा, मी तुमचा फॅन झालो.”