Dudhsagar Waterfall Video: सोशल मीडियावर विविध व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या दिवसात अनेक ठिकाणांचे सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंवर लाखो व्ह्यूज अन् लाइक्स, कमेंट्सही येतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे, जो पाहून तुम्हालाही आनंद होईल.

पाऊस म्हटलं की, अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळतो. पावसाळ्याच्या दिवसांत विविध धबधब्यांना भेट देण्यासाठी पर्यटक आवर्जून जातात. शिवाय या धबधब्यांचे नयनरम्य दृश्य सोशल मीडियावर व्हिडीओंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निसर्गप्रेमींना पावसाळ्यात नद्या, समुद्र, डोंगर, धबधबे नेहमीच आकर्षिक करतातात. या दिवसात लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, कोकण, गोवा या ठिकाणी लोक आवर्जून जातात. या ठिकाणचे अनेक धबधबे खूप प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक धबधबा म्हणजे दूधसागर धबधबा; गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधबा आकर्षणाचे केंद्र आहे. खरं तर हा धबधबा गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर स्थित असून तो भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. सध्या या धबधब्याचा एक नयनरम्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही आनंद होईल.

Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
Shocking video girls in up baghpat fight over boyfriend on Road thrilling video went viral
प्रेमाचा हिंसक खेळ! कपडे फाटले तरी भान नाही; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा भर रस्त्यात तुफान राडा, VIDEO पाहून व्हाल हैराण
Shocking video truck accident video instead of helping him some people started lotting his mobile money
माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
One mistake and the game is over Young man's unnecessary stunt in the swimming pool viral video will make you shiver
“एक चूक अन् खेळ खल्लास!” स्विमिंग पुलमध्ये तरुणाची नको ती स्टंटबाजी, Viral Video पाहून अंगावर येईल काटा

नक्की काय पाहिलं व्हिडीओमध्ये? (Dudhsagar Waterfall Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दूधसागर धबधबा येथील रेल्वे रुळावरून ट्रेन जात असून त्याक्षणी एका तरुणाने हा व्हिडीओ शूट केला आहे. यावेळी या धबधब्याचे दृश्य अगदी पाहण्यासारखे आहे. हा धबधबा पाहताच ट्रेनमधील प्रवासी आनंदाने ओरडताना दिसत आहेत, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. खरं तर या धबधब्यातील पाणी डोंगरावरून वेगाने पडत असल्यामुळे हा धबधबा दुधासारखा दिसतो, त्यामुळे त्याला दूधसागर असे नाव देण्यात आले आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nammakarnatakatrends या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत सतरा मिलियन व्ह्यूज मिळाल्या असून यावर एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘असल्या मित्राचं करायचं काय…’ भरमंडपात अचानक कॉटन कँडी घेऊन पोहोचला, पुढे जे घडलं… VIDEO पाहून माराल कपाळावर हात

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Dudhsagar Waterfall Video)

एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “जर एखादी व्यक्ती यावेळी ट्रेनमध्ये झोपली असेल तर तिने खूप काही मिस केलंय”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “व्वा, हे किती सुंदर आहे”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “दूधसागरचे दूध उकळत आहे असं वाटतंय”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “दूधसागर आता दूध महासागर झाला आहे.”

Story img Loader