Viral Video: मध हा पदार्थ सर्वच घरांमध्ये आढळून येतो. चवीला गोड असणारा हा पदार्थ अनेक पदार्थांमध्ये, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये जगण्यासाठी अन्न मिळावं म्हणून मधमाशा मधाच्या पोळ्यामध्ये तो जमा करतात. त्वचेच्या समस्या म्हणा किंवा अनेक समस्यांवर मध रामबाण उपाय ठरतो. पण, तुम्ही कधी मध काढण्याची प्रक्रिया पाहिली आहे का? नाही, तर मध काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही या मताशी नक्कीच सहमत व्हाल.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, उंच डोगरांमध्ये मोठ मोठे मधमाशांचे पोळे लटकलेले दिसत आहे. तसेच या पोळ्यांमधून मध काढण्याचं काम काही कामगार करताना दिसत आहेत. या कामगारांनी अंगावर संपूर्ण प्रोटेक्शन कीट घातलं असून या मधमाश्यांचा सामना करत अगदी बिनधास्त पोळ्यामधून मध काढताना दिसत आहेत. मधमाश्यांना दूर करून पोळ्यातून मध काढून त्यांच्याजवळ असणाऱ्या बादलीत ते ठेवताना दिसत आहेत. मध काढण्याची प्रक्रिया एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, काही कामगार मध काढण्यासाठी उंच डोंगरांमध्ये दोरीच्या सहाय्यानं लटकलेले दिसत आहेत. तसेच हातमोजे घालून, उपकरणांच्या सहाय्याने मधाच्या पोळ्यावर साचलेला मधमाश्यांचा थर काढून बाजूला फेकत आहेत. त्यानंतर मधाचा भाग काढून मध गोळा करून घेतला जातो आहे. पण, हे सर्व करताना या कामगारांना हजारो माश्यांचा सामना करावा लागतो आहे. गोड मधासाठी कामगारांना एवढी मेहनत घ्यावी लागते आहे, हे पाहून तुमच्याही अंगावर नक्कीच शहारे येतील.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @tradingMaxiSL या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मध काढणारे कामगार आपला जीव धोक्यात टाकून मध काढतात, हे पाहून तुम्हीसुद्धा त्यांचे नक्कीच कौतुक कराल. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण, मध काढण्याच्या प्रक्रियेच्या या थरारक व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.