Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. त्यात बऱ्याचदा घरातील पाळीव प्राण्यांसोबतचे व्हिडीओदेखील युजर्स शेअर करीत असतात. बरेच जण घरात आवडीने कुत्रा, मांजर पाळतात. या प्राण्यांवर घरातील सगळ्यांचा जीव असतो, त्यामुळे त्यांनी केलेली प्रत्येक चूक माफ असते. या पाळीव प्राण्यांना अनेकदा घरातील इतर सदस्यांहून अधिक चांगली वागणूक दिली जाते. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील अवाक व्हाल.
प्राणीदेखील माणसांइतकेच खूप हुशार असतात. त्यांना त्यांचे आवडते पदार्थ, आवडत्या गोष्टी हे सर्व काही ठाऊक असते. त्यामुळे त्या गोष्टी खाण्यासाठी ते अनेकदा आपल्या मालकाकडे हट्टदेखील करतात. आतापर्यंत आपण सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओमध्ये असेच काहीतरी पाहायला मिळत आहे; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्र्याचे पिल्लू चक्क फ्रिजमध्ये चढून केक खाताना दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला कुत्र्याची मालकीण फ्रिजचा दरवाजा उघडते, तेव्हा तिला फ्रिजमध्ये कुत्र्याचे पिल्लू त्याच्या आवडीचा केक खात असल्याचे दिसते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करीत युजरने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आता फ्रिजमधील पदार्थ अचानक गायब झाले याचं आश्चर्य वाटणार नाही.”
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @fabian_crk28 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत २८ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, यापूर्वीदेखील सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यातील एका व्हिडीओमध्ये एका कुत्र्याला त्याची मालकीण चिकन खायला देते म्हणून तो डान्स करताना दिसला होता. तर आणखी एका व्हिडीओमध्ये कुत्रा ‘कॅट वॉक’ करताना दिसला होता. तसेच एका कुत्र्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यामध्ये तो चक्क पावसात भिजण्याचा आनंद लुटत असल्याचे दिसत होते. तो व्हिडीओही खूप चर्चेत होता.