Viral Video: प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आई होणं हा एक सुखद क्षण समजला जातो. मूल जन्माला येणार ही बातमी कळल्यापासून ते नऊ महिन्यांपर्यंत गर्भवती स्त्री आपल्या गर्भातल्या जीवाला जीवापाड जपते. तसेच बाळ निरोगी जन्माला यावं यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला, पौष्टिक आहार, गर्भसंस्कार याकडे काटेकोरपणे लक्ष देते. प्रसूतीकाळातही अनेक यातना सहज करते. आईच्या या उपकारांची परतफेड कोणतीही व्यक्ती कधीच करू शकत नाही. सध्या अशाच एका आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण भारावून जाल.

आपल्याकडे पूर्वीपासून गर्भवती स्त्रिया ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवदगीता यांसारख्या ग्रंथाचे पठण करतात किंवा आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून मंत्राचा जप करतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असेच काहीतरी पाहायला मिळत आहे. त्यात एक महिला प्रसूतीदरम्यान देवाचे भजन गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नेटकरी यावर सुंदर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रुग्णालयात महिला तिच्या प्रसूतीदरम्यान “श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी… हे नाथ नारायण वासुदेवा” हे सुंदर भजन गाताना दिसत आहे. प्रसूतीकाळातीला वेदना खूप असह्य असतात. त्या परिस्थितीत अनेक महिला रडतात, ओरडतात; पण ही महिला कोणताही आक्रोश न करता, श्रीकृष्णाचे भजन गात आहे. त्यामुळे या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडीओ शेअरकर्त्या व्यक्तीने, हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येत असल्याचे लिहिले आहे. तसेच त्याने लिहिलेय, “तिने बाळाला दीर्घायुष्यी जीवन मिळावं यासाठी देवाकडे प्रार्थना केली.”

हेही वाचा: ‘जेव्हा मृत्यू जवळ येतो…’, वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या चित्त्याला पाहून ससाही सुसाट धावला; पण पुढच्या पाच सेकंदात जे घडलं VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओ X(ट्विटर)वरील @Fenil Kothari या अकाउंटवरू शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लोकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिलेय की, आईचं खरं प्रेम. तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेय की, आईच्या प्रेमाची कधीही तुलना होऊ शकत नाही. तर आणखी एकाने लिहिलेय की, ते बाळही खूप लकी आहे. तर आणखी काही जण हा व्हिडीओ पाहून खूप भावनिक झाले आहेत.

Story img Loader